PM Modi In Manipur Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 2023 मध्ये झालेल्या भीषण हिंसाचारानंतर जवळपास दोन वर्षांनी ते या राज्याला भेट देत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी 8,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत, ज्यामुळे हिंसाचारग्रस्त भागात विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदींना मणिपूरला भेट देण्याची मागणी केली होती. अखेर, दोन वर्षांनंतर हा दौरा होत आहे. पंतप्रधान मोदी चुराचांदपूर येथे 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि तेथील विस्थापित लोकांशी संवाद साधतील. जातीय हिंसाचारात सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांपैकी हा एक आहे.
(नक्की वाचा- Mohan Bhagwat : सरसंघचालकांनी उघड केले अमेरिकेच्या मनातील गुपित; सांगितले, 'भारतावर टॅरिफ का लावला?')
दौऱ्यापूर्वी तोडफोड आणि प्रकल्पांची पायाभरणी
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी, चुराचांदपूरमध्ये अज्ञात व्यक्तींनी कार्यक्रमासाठी तयार केलेल्या सजावटीची तोडफोड केली. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु तरीही दौरा नियोजित वेळेनुसार होणार आहे.
(नक्की वाचा- AI VIDEO: पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईच्या एआय व्हिडिओ वाद, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल)
चुराचांदपूर व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी इम्फाळमध्येही 1,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील योजनांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्य परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळत आहेत.