
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय एजन्सींनी केलेल्या विनंतीवरून ही अटक करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून या यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार मेहुल चोक्सी सध्या बेल्जियममध्ये आहे. सीबीआय आणि ईडी सतत तिथल्या एजन्सींच्या संपर्कात आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पीएनबी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून फरार मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये ताब्यात घेण्यात आले.
(नक्की वाचा- CM Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मोफत विजेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले...)
फरार हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील भारतातील मोस्ट वॉन्टेडपैकी एक - मेहुल चोक्सी सध्या बेल्जियममध्ये आहे. बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले होते की, त्यांना मेहुल चोक्सीच्या त्यांच्या देशात उपस्थितीची जाणीव आहे. परराष्ट्र मंत्रालय या महत्त्वाच्या प्रकरणातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
(नक्की वाचा- CIDCO News: गरीबांचे घर, श्रीमंतांचे दर ! सिडकोच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं आता काय केलं पाहा)
पंजाब नॅशनल बँकेतील 13,500 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीसोबत सहभाग असल्याचा मेहुल चोक्सीवर आरोप आहे. तो त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या बँकेतील पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीस येण्याच्या काही आठवड्यांपूर्वी जानेवारी 2018 मध्ये मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी भारतातून पळ काढला. घोटाळा उघडकीस येण्याच्या दोन महिने आधी त्याने अँटिग्वाचे नागरिकत्व घेतल्याचे नंतर उघड झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world