जाहिरात

Rashtrapati Bhavan : पहिल्यांदाच सनई-चौघड्यांचे सूर घुमणार, थेट राष्ट्रपती भवनातात लग्न करणाऱ्या पूनम गुप्ता कोण आहेत?

Poonam Gupta : पहिल्यांदाच कोणा नवरा-नवरीला राष्ट्रपती भवनात सप्तपदी घेण्याची संधी मिळणार आहे. 

Rashtrapati Bhavan : पहिल्यांदाच सनई-चौघड्यांचे सूर घुमणार, थेट राष्ट्रपती भवनातात लग्न करणाऱ्या पूनम गुप्ता कोण आहेत?

Marriage Ceremony at Rashtrapati Bhavan : मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे राहणाऱ्या सीआरपीएफच्या असिस्टेंट कमांडेंट पूनम गुप्ता यांचं लग्न राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसा क्राउन कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पीएसओ म्हणून काम करणाऱ्या पूनम पांडे (CRPF Assistant Commandant Poonam Gupta) यांच्या चांगल्या वागणुकीवर प्रभावित होऊन राष्ट्रपतींनी (President Draupadi Murmu) त्यांच्या लग्नासाठी विशेष परवानगी दिली आहे. त्यांच्याच आदेशानंतर राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसा क्राउन कॉम्प्लेक्समध्ये पूनम गुप्ता यांचं लग्न पार पडणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पूनम गुप्ता यांचं लग्न जम्मू-काश्मीरनधील सीआरपीएफचे असिस्टेंड कमांडेट अवनीश कुमार यांच्याशी होणार आहे. पहिल्यांच राष्ट्रपती भवनात कोणा सीआरपीएफ अधिकाऱ्याचं लग्न होणार आहे. इतकच नाही तर पहिल्यांदाच कोणा नवरा-नवरीला या भवनात सप्तपदी घेण्याची संधी मिळणार आहे. 

Poor Lady राष्ट्रपती मुर्मूंच्या अभिभाषावर काय म्हणाल्या सोनिया गांधी? पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी

नक्की वाचा - Poor Lady राष्ट्रपती मुर्मूंच्या अभिभाषावर काय म्हणाल्या सोनिया गांधी? पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी

कोण आहेत पूनम गुप्ता?
पूनम गुप्ता या राष्ट्रपती भवनात पीएसओ पदावर तैनात आहेत. त्यांचा विवाह 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. असिस्टेंट कमांडेट पूनम गुप्ता यांनी 2023  मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफ महिला तुकडीचं नेतृत्व केलं होतं. पूनम गुप्ता या गणित विषयात पदवीधर आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीधर आहे. त्यांनी जवाहर नवोदय विद्यापीठातून शिक्षण घेतलं. त्यांनी ग्वाल्हेरच्या जीवाजी विद्यापीठातून बी.एडदेखील केलंय. पूनम यांनी यूपीएससी सीएपीएफ परीक्षा 2028 मध्ये 81 वा क्रमांक पटकावलं आणि सीआरपीएफमध्ये असिस्टेंड कमांडेट झाल्या. राष्ट्रपदी द्रौपद्री मुर्मू या पूनम यांच्या वागणुकीवर खूश आहेत. पूनम लग्न करणार असल्याचं त्यांना कळताच त्यांनी राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसा क्राउन कॉम्प्लेक्समध्ये लग्नाची व्यवस्था केली.