
Rahul gandhi shivaji maharaj : आज जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती (shivaji maharaj jayanti 2025) साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं युद्धकौशल्य, स्वराज्य, स्त्रीदाक्षिण्य, जाती-पातीच्या पलीकडचं सत्ताकारण यांसारखे अनेक पैलू महाराजांच्या इतिहासातून पाहायला मिळतात. महाराज हे अख्ख्या देशाचं अराध्य दैवत आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात महाराजांचा जन्मोस्तव अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. अगदी राजकीय पक्षातील नेतेमंडळीसुद्धा आवर्जून महाराजांना आदरांजली वाहत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान राहुल गांधी यांनी शिवरायांसाठी केलेलं ट्विट वादात सापडलं आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या ट्विटवरील एका शब्दावरुन वादंग निर्माण केला आहे. राहुल गांधींनी तो शब्द बदलावा आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
नक्की वाचा - Shivaji Maharaj : राज्यभिषेकावेळी महाराजांची केली होती सुवर्ण तूला, या 16,000 सोन्याच्या होनचं पुढे काय झालं?

काय आहे ते ट्विट?
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोस्तवानिमित्ताने एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना सादर नमन आणि विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. महाराजांकडे असलेलं धाडस आणि शौर्यातून त्यांनी आम्हाला निर्भय आणि समर्पणासह आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचं आयुष्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
नक्की वाचा - Shiv Jayanti 2025 : महाराजांचं जबरदस्त व्यवस्थापन; सैनिकांना पगार, प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी बोनसही!

भाजपने राहुल गांधींच्या ट्विटमध्ये श्रद्धांजली या शब्दावर आक्षेप नोंदवला आहे. जयंती दिनी श्रद्धांजली अर्पण केली जात नाही. तर जयंतीला आदरांजली व्यक्त करतात. मात्र राहुल गांधी नेहमीच महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल कळत नकळत अनादर व्यक्त करीत असतात. त्यामुळे त्यांनी तत्काळ ट्विटमधील श्रद्धांजली शब्द बदलावा अशी मागणी भातखळकरांनी केली आहे.
श्रद्धांजलीचा नेमका अर्थ काय?
मराठी भाषेत श्रद्धांजलीचा अर्थ श्रद्धेने नमन करणे असा होतो. आदरणीय व्यक्तींसाठी हा शब्द वापरला जातो. मात्र आपल्याकडे जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने काही ठराविक शब्द वापरण्याची प्रथा आहे. त्यामुळे येथे राहुल गांधींनी ट्विटमध्ये श्रद्धांजली शब्द वापरून अवचित्य भंग झाल्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world