राहुल गांधींनी विरोधी पक्षेनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी, काँग्रेस कार्यकारिणीत नेत्यांचा सूर

काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भविष्यातील रुपरेखा देखील तयार करण्यात आली आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, महासचिव केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भविष्यातील रुपरेखा देखील तयार करण्यात आली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं की, काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते राहुल गांधी यांनी लोकसभेचे विरोधी नेतेपद स्वीकारावे अशी विनंती करण्यात आली. याबाबत विचार करु असं देखील राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.  

काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी म्हटलं की, प्रत्येक निवडणुकीनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होते. निवडणुकीबाबत विश्लेषण या बैठकीत केलं जातं. राहुल गांधी 2004  पासून पाचव्यांदा लोकसभेत जात आहेत. ते वरिष्ठ नेते आहेत. ते सरकारला थेट प्रश्न विचारतात. आत्मविश्वास आणि निर्भिडपणे राहुल गांधी आपलं मत मांडतात. त्यामुळे त्यांनी संसदीय दलाचे नेते बनलं पाहिजे. 

( नक्की वाचा : पराभूत होऊनही मोदींनी थोपटली पंकजा मुंडेंची पाठ, दिल्लीत नेमकं काय झालं?)

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वारिंग यांनी म्हटलं की, आमची मागणी आहे की राहुल गांधी यांनी पुढे यावं. मात्र अंतिम निर्णय शीर्ष नेतृत्वाचा आहे. राहुल गांधी यांनाच याबाबत निर्णय घ्यायचा आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : फडणवीसांच्या राजीनामा प्रस्तावावर अमित शाहांकडून आलं उत्तर, म्हणाले....)

काँग्रेसच्या अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की, राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं. नरेंद्र मोदी यांना भिडणारं देशाच्या राजकारणात कोण असेल तर ते राहुल गांधी आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राहुल गांधी उत्तम पेलू शकतात. त्यामुळे आता राहुल गांधी याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )
Topics mentioned in this article