- रेल मंत्री ने CRIS के 40वें स्थापना दिवस पर RailOne ऐप लॉन्च किया.
- RailOne ऐप Android और iOS दोनों प्लेटफॉर्म पर उपलब्ध है.
- यह ऐप यात्रियों को टिकटिंग, यात्रा योजना और रेल मदद सेवाएं प्रदान करता है.
- सिंगल साइन-ऑन से उपयोगकर्ताओं को पासवर्ड याद रखने की आवश्यकता नहीं होती.
RailOne App : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेलवन (RailOne) मोबाईल अॅप लाँच केले. रेल्वे प्रवाशांसाठी एक-स्टॉप ट्रेन अॅप आहे, जिथे आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटे बुक करता येणार आहे. तसेच प्रवासी इतर अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता. RailOne अॅप असेल तर तुम्हाला IRCTC Rail Connect आणि UTS अॅपची आवश्यकता भासणार नाही, कारण हे नवीन अॅप दोन्ही अॅप्सचे सर्व काम एकट्याने करू शकते. इतकेच नाही तर या अॅपमध्ये असे अनेक फीचर्स आहेत जे IRCTC Rail Connect आणि UTS अॅपवर उपलब्ध नाहीत.
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे RailOne या नवीन ॲपचा प्रारंभ केला. रेलवन हे ॲप रेल्वे आणि प्रवासी यांच्यातील संवाद सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते.
(नक्की वाचा- Food delivery: जेवणाची होम डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांची तक्रार करण्यासाठी आता लवकरच टोल फ्री क्रमांक)
रेलवन हे ॲप अँड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएस ॲप स्टोअरवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हे एक व्यापक, सर्वसमावेशक ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये युजर्स फ्रेंडली इंटरफेस आहे. यात सर्व प्रवासी सेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत. अॅप सध्या हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे.
रेलवन अॅपमध्ये काय सुविधा मिळतील?
RailOne मोबाईल अॅपवर, तुम्ही कोणत्याही ट्रेनमध्ये सामान्य वर्गासाठी आरक्षित तिकिटे तसेच अनारक्षित तिकिटे बुक करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही या अॅपवर प्लॅटफॉर्म तिकिटे देखील बुक करू शकता. अॅपवर कोणत्याही ट्रेनची माहिती शोधू शकता, पीएनआर स्थिती तपासू शकता, कोचची स्थिती पाहू शकता, तुमच्या ट्रेनचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करू शकता. ट्रेनमध्ये तुमच्या सीटवर जेवण ऑर्डर करू शकता, तुमच्या प्रवासाच्या अनुभवावर आधारित अभिप्राय देऊ शकता. परतावा दाखल करू शकता आणि कोणत्याही समस्येबद्दल तक्रार करू शकता किंवा रेल मदत द्वारे मदत घेऊ शकता.
(नक्की वाचा- Delhi: दिल्लीमध्ये 'त्या' कारची जप्ती मोहीम, पेट्रोल भरायला गेलेली मर्सिडीज सील, प्रकरण काय?)
आयआरसीटीसीवर आरक्षित तिकिटांची उपलब्धता कायम राहील. आयआरसीटीसीसोबत भागीदारी केलेल्या इतर अनेक व्यावसायिक अॅप्सप्रमाणेच रेलवन अॅपलाही आयआरसीटीसीने अधिकृत केले आहे. RailOne मध्ये mPIN किंवा बायोमेट्रिकद्वारे लॉगिनसह सिंगल-साइन-ऑनची सुविधा आहे. हे विद्यमान RailConnect आणि UTS संदर्भांनादेखील संलग्न करता येते. हे ॲप जागा वाचवणारे आहे, कारण इतर अनेक ॲप्स स्थापित करण्याची आवश्यकता उरत नाही.