
Ram Lalla Surya Tilak Video: आज रामनवमी, प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस. हिंदू धर्मातील पवित्र सण मानल्या जाणाऱ्या रामनवमीचा देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात ठिकठिकाणी रामजन्मोत्सवाचा सोहळा आयोजित करण्यात आला असून मंदिरे भाविकांच्या गर्दीने अन् जय श्रीरामच्या घोषणांनी फुलून निघत आहेत. अयोध्येतील राममंदिरातही रामनवमीचा अलौकिक उत्साह पाहायला मिळत असून रामलल्लाला सूर्यकिरणांचा अभिषेकही घालण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेशमधील अयोध्येत रामनवमीचा उत्साह अन् जल्लोष पाहायला मिळत आहे. संपूर्ण शहर भक्तीमय झाले असून राममंदिराला भव्यदिव्य अशी आरासही करण्यात आली आहे. आज दुपारी बारा च्या मुहूर्तावर रामलल्लाचा सूर्याच्या किरणांनी अभिषेक झाला. 4 लेन्स आणि चार आरशांच्या मदतीने सूर्यकिरण रामलल्लाच्या कपाळावर पोहोचले. वैदिक मंत्रांच्या जपाने मंदिर परिसर भक्तीमय झाला. यावेळी, भाविकांनी भगवान राम आणि सीता मातेचा गजरही केला.
#WATCH | ‘Surya Tilak' illuminates Ram Lalla's forehead at the Ram Janmabhoomi Temple in Ayodhya, on the occasion of Ram Navami
— ANI (@ANI) April 6, 2025
'Surya Tilak' occurs exactly at 12 noon on Ram Navami when a beam of sunlight is precisely directed onto the forehead of the idol of Ram Lalla, forming… pic.twitter.com/gtI3Pbe2g1
या प्रसंगी संपूर्ण मंदिर परिसर भगवान रामाच्या घोषणांनी अन् भक्तीने फुलून गेला होता. राम मंदिरात भक्तांची गर्दी असते. रविवारी सकाळपासूनच राम मंदिरात कार्यक्रम सुरू झाले. राम लल्लाच्या सूर्यअभिषेकावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. केवळ देशातीलच नाही तर परदेशातील लोकही राम मंदिरात आले असून या अलौकिक क्षणाचे साक्षीदार बनले. राम मंदिरात येणाऱ्या भाविकांवर ड्रोनच्या मदतीने शरयू जलाचा वर्षावही करण्यात आला.
दरम्यान, दुपारी ठीक 12 वाजता सूर्याभिषेक झाला आणि सूर्याची किरणे थेट श्री रामलल्लाच्या कपाळावर पडली. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दर्शनाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. काही शास्त्रज्ञही राम लल्लासाठी टिळक तयार करण्यात व्यस्त होते.
नक्की वाचा - Amit Gorkhe News: 'खोटारडेपणाचा निषेध...', मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आमदार अमित गोरखेंचा संताप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world