जाहिरात

Ram Navami 2025: रामनवमीच्या पूजेसाठी या रंगाचे वस्त्र परिधान करणं ठरेल शुभ, जाणून घ्या हे कारण

Ram Navami Puja Shubh Muhurat: रामनवमीच्या दिवशी पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त, पूजा कशी करावी आणि कोणत्या सामग्रीचा वापर करावा? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Ram Navami 2025: रामनवमीच्या पूजेसाठी या रंगाचे वस्त्र परिधान करणं ठरेल शुभ, जाणून घ्या हे कारण

Ram Navami 2025: हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला प्रभू श्रीरामाचा (Ram Navami 2025) जन्म झाला होता आणि याच तिथीला दरवर्षी रामनवमीचा (Ram Navami 2025) उत्सव देशभरात साजरा केला जातो. रामललाचा जन्म कर्क लग्नात आणि पुनर्वसु नक्षत्रात दुपारी झाला होता म्हणूनच भगवान रामाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी येतो. यंदा रामनवमी 6 एप्रिलला आहे. रामनवमीच्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी, पूजेसाठी कोणकोणत्या सामग्रीचा समावेश करावा? याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रामनवमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त | Ram Navami Puja Shubh Muhurat 

रामललाची (Ram Navami Puja) पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्ताचा कालावधी एकूण अडीच तासांचा आहे. पूजेचा मुहूर्त सकाळी 11 वाजता सुरू होणार असून दुपारी 1:35 वाजेपर्यंत असेल. या कालावधीमध्ये रामनवमीची पूजा संपन्न केली जाऊ शकते.  

Ram Navami Date 2025: रामनवमी कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजा विधीसह सर्व माहिती मिळेल एका क्लिकवर

(नक्की वाचा: Ram Navami Date 2025: रामनवमी कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजा विधीसह सर्व माहिती मिळेल एका क्लिकवर)

रामनवमीची पूजा सामग्री आणि विधी (Ram Navami Puja Samagri, Puja Vidhi)

- रामनवमीची पूजा करण्यासाठी प्रभू श्री राम, सीतामाता, लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती सजवलेल्या चौरंगावर ठेवावी.  सर्व मूर्तींवर जल आणि पंचामृत अर्पण करावे. आता हळदकुंकू, चंदन, अक्षता, फुले अर्पण करा. यानंतर धूप-दिवे लावून नैवेद्य अर्पण करावा. 

- पूजेच्या सामग्रीमध्ये केतकीची फुले, चंपा, मालती, कमल, गोंडे, गुलाब, चमेलीच्या फुलांचा समावेश करू शकता. यासह तुळशी, बेलपत्र, शमीच्या पानांचाही समावेश करू शकता. 

- पूजेची सामग्री श्रीरामाच्या मूर्तीस अर्पण करा आणि यानंतर आरती-मंत्रांचा जप करावा. या दिवशी श्री रामचरितमानसातील श्लोकांचे पठण करणेही खूप शुभ मानले जाते.

- श्रीरामाच्या मंत्रांचा जप करण्यासाठी उत्तर किंवा पूर्वे दिशेला चेहरा करुन बसावे. पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या आसनावर बसून तुळशीच्या माळेने जप करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Happy Ram Navami 2025: श्री रामाच्या आशीर्वादाने जीवन होईल सुखी! रामनवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Ram Navami 2025: श्री रामाच्या आशीर्वादाने जीवन होईल सुखी! रामनवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा)

कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे?

  • रामनवमीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ ठरेल.
  • कारण हे दोन्ही रंग श्रीरामाचे आवडीचे रंग मानले जातात.  

घरामध्ये दिवे प्रज्वलित करा

रामनवमीच्या दिवशी घरामध्ये दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. पहाटे उठून स्नान करुन घर स्वच्छ करावे. घरामध्ये गंगाजल शिंपडावे. यानंतर कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. रामजन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी घरामध्ये तुपाचा दिवा लावावा. मंत्र जप करताना दिवा लावणे शुभ मानले जाते.  

Ram Navami 2025: रामनवमीच्या पूजेमध्ये या खास गोष्टींची घ्या काळजी, प्रभू श्रीरामाचा मिळेल आशीर्वाद

(नक्की वाचा: Ram Navami 2025: रामनवमीच्या पूजेमध्ये या खास गोष्टींची घ्या काळजी, प्रभू श्रीरामाचा मिळेल आशीर्वाद)

श्रीरामाच्या मंत्राचा करावा जप (Shree Ram Mantra Jap)

ऊँ रां रामाय नम:।। 
आपदामपहर्तार दातारं सर्वसंपदाम्। लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्।।
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे। रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:।।
ॐ दशरथये विद्महे सीतावल्लभाय धीमहि, तन्नो राम प्रचोदयात्॥
राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने।। 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)