जाहिरात

Ram Navami 2025: रामनवमीच्या पूजेमध्ये या खास गोष्टींची घ्या काळजी, प्रभू श्रीरामाचा मिळेल आशीर्वाद

Ram Navami 2025 Date And Time: रामनवमीची पूजा करताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी...

Ram Navami 2025: रामनवमीच्या पूजेमध्ये या खास गोष्टींची घ्या काळजी, प्रभू श्रीरामाचा मिळेल आशीर्वाद
"Ram Navami 2025 Puja: रामनवमीची पूजा कशी करावी?"

Ram Navami 2025 Date And Time: चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी मनापासून पूजा-अर्चना केल्यास प्रभू श्री रामाचा आशीर्वाद मिळतो, असे म्हणतात. तसेच भगवान रामाच्या आदर्श विचारांचे पालन करण्याची प्रेरणा देखील मिळते. श्रीराम नवमीची पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रामनवमीची पूजा कशी करावी? How to worship on Ram Navami

- रामनवमीच्या (Ram Navami Puja 2025) दिवशी 'श्री राम जय राम जय जय राम' या नामाचा जप करावा. यामुळे जीवनामध्ये शुभ गोष्टी आणि शांतता लाभेल. शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासही लाभ मिळतील. 

- रामनवमीच्या दिवशी श्रीरामचरितमानस आणि सुंदरकांडचे पठण आवर्जून करावे. रामायणाचे पठण केल्यास मनाची शुद्ध होईल. मनामध्ये सकारात्मक विचार येण्यास मदत मिळेल. श्रीरामचरितमानस आणि सुंदरकांडचे पठण केल्यास प्रभू श्रीराम आणि हनुमानाची कृपादृष्टी कायम राहील. 

(नक्की वाचा: Ram Navami Date 2025: रामनवमी कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजा विधीसह सर्व माहिती मिळेल एका क्लिकवर)

- रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाच्या विचारांचे आचरण करण्याचा प्रयत्न करावा. नातेसंबंधांमध्येही आदर, संयम आणि प्रेम राखण्याचा प्रयत्न करा. याशिवाय कधीही कोणालाही फसवू नका आणि योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा.

- रामनवमीच्या दिवशी उपवास करावा, यामुळे प्रभू श्री रामाचा आशीर्वाद मिळेल आणि कृपादृष्टीही कायम राहील.  रामनवमीच्या दिवशी हनुमानाचीही पूजा नक्की करावी. मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि सुंदरकांडचे पठण केल्यास जीवनातील समस्या दूर होण्यास मदत मिळू शकेल. 

Happy Ram Navami 2025: श्री रामाच्या आशीर्वादाने जीवन होईल सुखी! रामनवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

(नक्की वाचा: Happy Ram Navami 2025: श्री रामाच्या आशीर्वादाने जीवन होईल सुखी! रामनवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा)

- रामनवमीच्या दिवशी या गोष्टींची काळजी घेतल्यास प्रभू श्री रामाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)