जाहिरात

Ratan Tata : रतन टाटा अत्यवस्थ, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

86 वर्षांच्या रतन टाटा यांना वार्धक्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Ratan Tata : रतन टाटा अत्यवस्थ, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू
मुंबई:

जगप्रसिद्ध उद्योगपती टाटा सन्सचे (Tata Sons) चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) हे अत्यवस्थ आहेत. त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपण नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झालो असल्याचे सांगितले होते. मात्र सध्या रतन टाटा यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 86 वर्षांच्या रतन टाटा यांना वार्धक्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

नक्की वाचा : टाटांचा जबरा फॅन! त्याची एक कृती अन् लाखो मनं जिंकली

सोमवारी रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर ते अत्यवस्थ असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या मात्र रतन टाटा यांच्यातर्फे त्यावर तातडीने खुलासा करण्यात आला होता. रतन टाटा यांनी 1991 साली टाटा समूहाची धुरा हाती घेतली होती. रतन टाटा यांच्या पणजोबांनी टाटा समूहाची स्थापना केली होती. भारताच्या जडणघडणीमध्ये टाटा समूहाचा फार मोठा वाटा आहे. 2012 पर्यंत रतन टाटा यांनी समूहाची धुरा सांभाळली होती. 1996 साली त्यांनी टाटा टेलिकम्युनिकेशन्सची स्थापना केली होती. 2004 साली टाटा कन्सल्टन्सी कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत झाली होती.  

टाटा यांचे घराणे हे भारतातील लोखंड व पोलाद उद्योगाचा पाया घालणारे, तसेच भारताच्या औद्योगिक प्रगतीकरिता कापडगिरण्या, जलविद्युत्‌प्रकल्प उभारणारे जगप्रसिद्ध कारखानदार, व्यापारी, दानशूर व देशभक्त घराणे म्हणून परिचित आहे. टाटा उद्योगसमूहाची स्थापना जमशेटजी नसरवानजी यांनी केली होती. सर दोराबजी व सर रतनजी हे जमशेटजी यांचे पुत्र होते. जमशेटजींचे पुतणे जहांगीर रतनजी दादाभाई (जे. आर. डी) यांनी टाटा समूहाचा उद्योगविस्तार फार मोठ्या प्रमाणावर केला. ते टाटांच्या घराण्यातील धडाडीचे, कल्पक व दीर्घोद्योगी म्हणून नावारुपाला आले. 

1950 साली टाटा समूहाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. भारतातील सगळ्यात जुना आणि मोठा तसेच प्रसिद्ध उद्योगसमूह म्हणून टाटा समूहाची जगभर ख्याती आहे. कापड-वस्त्रे, पोलाद व वीज, कृषि अवजारे व सामग्री, रेल्वेडबे व एंजिने, डिझेल ट्रक व अन्य अवजड सामग्री, रसायने, सिमेंट, खाद्यतेले, साबण व प्रसाधनवस्तू, मनोरंजनात्मक व इलेक्ट्रॉनीक उपकरणे अशा असंख्य वस्तूंचे उत्पादन टाटा समूहातील कंपन्या करत असतात. याशिवाय पर्यटन उद्योग, हॉटेल उद्योग व विमानव्यवसाय या क्षेत्रांमध्येही टाटा समूहाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Ramleela : हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेल्या रामलीलेतून मुस्लीम कलाकार गायब!
Ratan Tata : रतन टाटा अत्यवस्थ, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू
10 Interesting Facts On India's 'Most-Followed' Industrialist
Next Article
Ratan Tata : रतन टाटांबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?