जाहिरात
This Article is From May 29, 2024

सामूहिक हत्याकांडाने देश हादरला! तरुणाने कुटुंबातील 8 जणांची केली हत्या अन् स्वत:ही...  

जिल्ह्याच्या टोकाला वसलेल्या आदिवासी बहुल भागात एका आदिवासी कुटुंबातील आठ जणांची सामूहिक हत्या करण्यात आली आहे.

सामूहिक हत्याकांडाने देश हादरला! तरुणाने कुटुंबातील 8 जणांची केली हत्या अन् स्वत:ही...  
छिंदवाडा:

मध्य प्रदेशातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील छिंदवाडा जिल्ह्यातील एका आदिवासी तरुणाने कुटुंबातील 8 जणांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्याने कुऱ्हाडीने वार करीत एक एक करून घरातील प्रत्येक सदस्याला संपवलं. यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्याच्या एका बाजूला वसवलेल्या आदिवासी बहुल भागात एका आदिवासी कुटुंबातील आठ जणांची सामूहिक हत्या करण्यात आली आहे. सर्वांची हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी मानसिक रूग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मनोरूग्ण तरुणाने कुटुंब गाढ झोपेत असताना मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान  आपले आई-वडील, पत्नी, भाऊ, वहिनी, बहिण, दोन भाच्या अशा आठ जणांची हत्या केली. या मनोरूग्णाने स्वत:च्या दहा वर्षांच्या मुलावर कुऱ्हाडीने वार केले, यातून तो बचावला आहे. त्याची प्रकृती गंभीर असून छिंदवाडा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:ला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मध्यरात्री दोन ते तीन दरम्यान झाल्याचं सांगितलं जात आहे.

त्यांच्या घराजवळील लोकांचा आरडाओरडा ऐकून आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर साधारण 100 मीटर अंतरावर झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com