Crime News: कर्नाटकातील नेलमंगला येथून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. निवृत्त पोलीस उपअधीक्षकच्या मुलीने हुंडा, आक्षेपार्ह टिप्पणी आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप पती आणि सासऱ्यावर केले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
लग्नानंतर 15 दिवसांतच छळाची सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार, अनिताचा विवाह 2 नोव्हेंबर 2023 रोजी डॉ. गोवर्धन याच्याशी झाला होता. तिच्या वडिलांनी लग्नामध्ये सुमारे 25 लाख रुपये ज्यामध्ये सोने, चांदी आणि इतर खर्च केले होते. अनिताच्या तक्रारीनुसार, लग्नाला केवळ 15 दिवस झाल्यानंतर पती डॉ. गोवर्धन याने तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या माहेरच्या संपत्तीत आणि भाड्याच्या उत्पन्नात हिस्सेदारीची मागणी सुरू केली. नवऱ्याला नोकरी सोडून स्वतःचा नर्सिंग होम सुरू करायचा होता. यासाठी वडिलांकडून पैसे घेऊन येण्याचा दबाव टाकत असल्याचा आरोप अनिताने केला आहे.
(नक्की वाचा- Nashik News: मदतीचा बहाना मग धमकावलं; भोंदूबाबाचा महिलेवर 14 वर्ष लैंगिक अत्याचार, लाखो रुपयेही लुटले)
सासऱ्याकडून अश्लील कमेंट्स
या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप अनिताने सासरे प्रोफेसर नागराजू यांच्यावर केले आहेत. एफआयआरनुसार, सासरे केवळ अश्लील टिप्पण्या करत नव्हते, तर शारीरिकरित्याही तिला त्रास देत होते.
अनिताने तक्रारीत सांगितले की, तिचे सासरे तिच्यावर घाणेरड्या कमेंट्स करत होते. लग्नाला इतके महिने झाले, कोणती 'गुड न्यूज' का नाही? किंवा माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल, तर मीच येतो. इतकेच नाही तर सासऱ्यांनी तिला 'मॉडर्न मुलींसारखे, शॉर्ट कपडे घालून माझ्यासमोर यायचे'*
अनिताने जेव्हा हा सगळा प्रकार घरात सांगितला त्यावेळी तिचा नवरा डॉ. गोवर्धन आणि सासूने तिलाच उलट समजावले. घरातला विषय आहे, सांभाळून घे असं म्हणत पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा- Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)
नवरा, सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
अनिताच्या तक्रारीवरून पती, सासरे आणि सासू यांच्याकडून होणाऱ्या सततच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अनिताने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पती, सासरे आणि सासू या तिघांविरुद्ध हुंड्यासाठी छळ आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world