झोपेत असताना एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की जागेवर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. असे एकूण 12 जण या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. हा अपघात राजस्थान मधील धौलपूर इथे राष्ट्रीय महामार्गावर सुनीपूर गावा जवळ झाला. शनिवारी रात्री जवळपास 11 वाजता हा अपघात झाला. या अपघातात 9 लहान मुलांचा तर 2 महिला आणि 1 पुरुषाचा मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्यात सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पोमध्ये बसलेल्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. ते एका कार्यक्रमातून घरी जात होते. त्या वेळी हा अपघात झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजस्थानमधील बाडी गावच्या गुमट मोहल्ला इथले रहाणारे नहून हे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री उशीरा ते आपल्या नातेवाईकांसह टेम्पोतून घरी परतत होते. पण त्यांचा टेम्पो NH 11 बी वरून बाडी या गावाच्या दिशेने भरधाव वेगाने चालला होता. त्याचवेळी एका स्लीपर कोट बस आणि या टेम्पोची जोरदार धडक झाली. सुनीपूर गावा जवळ ही टक्कर झाली. ही टक्केर इतकरी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. या अपघातात जागेवरच 11 जणांचा मृत्यू झाला तर एका लहान मुलाचा मृत्यू रूग्णालयात झाला.
ट्रेंडिंग बातमी - लढणार की पाडणार? जरांगेंचं ठरलं? मोठ्या निर्णयाच्या तयारीत मराठा समाज
ज्या वेळी अपघात झाला त्यावेळी जोरदार आवाज झाला. त्या आवाजाने बाजूला असलेल्या गावातील लोकांनी हायवेवर धाव घेतली. तिथली स्थिती गंभीर होती. त्यांनी तातडीने पोलीसांना ही माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. गाडीत मृतदेह पडले होते. ते बाहेर काढण्यात आले. तर जखमींना जवळच्यात सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मृत झालेले सर्वच जण बाडी या गावातील आहे. या अपघातात मृत झालेले हे नहनू आणि जहीर या एकाच परिवारातील आहेत. बाडी या गावा जवळच असलेल्या बरौली या गावात आपल्या नातेवाईकाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते.
ट्रेंडिंग बातमी - नाद करायचा नाय! पवार मुंडेंना दाखवून देणार, करेक्ट कार्यक्रमासाठी करेक्ट उमेदवार?
हा कार्यक्रम झाल्यानंतर ते पुन्हा घरी परतत होते. मात्र रात्री अकराच्या दरम्यान त्यांचा टेम्पो सुनीपूर गावा जवळ आला. त्याच वेळी एक भरधाव स्लीपर कोच बस जात होती. याबसने समोरूनच या टेम्पोला जोरदार धडक दिली. चालकाने बस वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी किंकाळ्या आणि रक्ताचा सडा पडला होता. अपघातात बसचा चालक आणि वाहक दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही बस पोलिसांनी जप्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world