दिल्ली: देशातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 23 डिसेंबर) रोजगार मेळा या भरती मोहिमेअंतर्गत 71,000 तरुणांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांना संबोधित करतील.
पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेद्र मोदी हे आज म्हणजे 23 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता दूरस्थ पद्धतीने नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना 71,000 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोजगार मेळावा हा पंतप्रधान यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल .हा रोजगार मेळावा देशभरातील 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालये/ विभागांमध्ये नियुक्त होतील. याआधी पंतप्रधान मोदींनी ऑक्टोबरमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले होते.
देशभरात 40 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अशा विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये भरती झालेले लोक यात सहभागी झाले होते.
दरम्यान, 22 ऑक्टोबर 2022 रोजी रोजगार मेळा सुरू झाला. अलीकडेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने सांगितले होते की, रोजगार मेळाव्याद्वारे आतापर्यंत लाखो तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world