जाहिरात

डोळे भरले, आवाज जड... खुर्ची सोडून गेले उपराष्ट्रपती! राज्यसभेत नेमकं काय झालं? Video

Jagdeep Dhankhar Leaves Rajya Sabha : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आज (गुरुवार, 8 ऑगस्ट) सभागृहात चांगलेच भावुक झाले होते. त्यांना इतकं हळवं यापूर्वी कुणी पाहिलं नव्हतं.

डोळे भरले, आवाज जड... खुर्ची सोडून गेले उपराष्ट्रपती! राज्यसभेत नेमकं काय झालं? Video
Jagdeep Dhankhar : राज्यसभेच्या कामकाजाच्या दरम्यान जगदीप धनकर चांगलेच भावुक झाले होते.
नवी दिल्ली:

Jagdeep Dhankhar Leaves Rajya Sabha : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आज (गुरुवार, 8 ऑगस्ट) सभागृहात चांगलेच भावुक झाले होते. त्यांना इतकं हळवं यापूर्वी कुणी पाहिलं नव्हतं. राज्यसभेत विरोधी पक्षांचा गोंधळ सुरु होता.सभापतींनी संतप्त खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही विरोधक शांत झाले नाहीत. ते पाहून सभापतींनी रागानं पहिल्यांदा खुर्ची सोडली. त्यानंतर त्यानंतर त्यांनी सभागृहाला संबोधन केलं, त्यावेळी ते चांगलेच भावुक झाले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमधील फायनलपूर्वी अपात्र जाहीर करण्यात आलं. या प्रकरणाचे पडसाद राज्यसभेत उमटले. राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी या विषयावर गोंधळ सुरु केला. सभापतींनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही विरोधकांचं समाधन झालं नाही. विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना धनखड चांगलेच भावुक झाले. 

विनेश फोगाटसोबत संपूर्ण देश उभा आहे, या प्रकरणात जे शक्य होतं ते सर्व केंद्र सरकारनं केलं आहे, असं केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी यावेळी सांगितलं. सभागृहातील कामकाजाच्या दरम्यान विरोधी पक्षाकडून सभापतीला दिली जाणारी वागणूक हा काळजीचा विषय आहे. या विषयावर विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं,' असं नड्डा यावेळी म्हणाले.

राज्यसभेत काय झालं?

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विनेश फोगट प्रकरण सभागृहात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण, सभापती धनखड यांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारानं हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यावेळी धनखड यांनी त्यांना पुन्हा हीच कृती केली तर बाहेर काढलं जाईल असा इशारा दिला. त्यानंतर सभागृहातील गोंधळ आणखी वाढला. विरोधी पक्षांच्या घोषणाबाजीच्या दरम्यान सभापती जगदीप धनखड चांगलेच भावुक दिसले. 

( नक्की वाचा : वक्फ बोर्डाच्या 'अनिर्बंध' अधिकारांवर गंडांतर, मोदी सरकारचं मोठं पाऊल )
 

सभापती धनखड यावेळी म्हणाले की, 'माननीय सदस्य या पवित्र सभागृहाला अराजकतेचं केंद्र बनवणे, भारतीय लोकशाहीवर आघात करणे, अध्यक्षांची प्रतिमा मलिन करणे, शारीरिक आव्हान देणं, हे अमर्यादीत आचरण नाही का? हा सर्व मर्यादा ओलांडण्याचा प्रकार आहे.'
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Fetus in Fetu : 4 दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीच्या पोटात बाळ; रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले! 
डोळे भरले, आवाज जड... खुर्ची सोडून गेले उपराष्ट्रपती! राज्यसभेत नेमकं काय झालं? Video
kolkata-high-court-ordered-cbi-investigation-into-rg-kar-medical-college-and-hospital-doctor-murder-case
Next Article
महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट, हायकोर्टानं दिला आदेश