
उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील हयात नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वस्तीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराचा मृतदेह त्याच्या प्रेयसीच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेनंतर प्रेयसी आणि तिचे कुटुंबीय फरार झाले आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न निर्माण झाली आहे. पोलिसही या घटनेचा खोलात जावून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या घरातील खोलीत प्रियकराचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. धक्कादायक बाब म्हणजे, प्रियकराने मृत्यूच्या अवघ्या 4 तास आधी प्रेयसीसोबतचा स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवला होता. त्याच्या काही मिनिटानंतरच ही धक्कादायक घटना घडली आहे.
नक्की वाचा - Awhad vs Padalkar: विधानभवनात आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, जोरदार राडा
सौरभ हा 20 वर्षाचा तरुण होता. तर मोहिनी तिचे ही वय 20 वर्ष आहे. हे दोघे एका बटाटा मिलमध्ये एकत्र काम करत होते. त्यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी मुलाच्या बॅगेत 10 हजार रुपये आणि मुलीचे कपडे सापडले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये पंचायत झाली. ज्यात दोघांनी वेगळे होण्याचं मान्य केलं होतं. मात्र, आज प्रियकराचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा - Vidhan Bhavan Rada: विधानभवनात राडा करणारा ऋषिकेश टकले कोण? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?
पोलिस अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितलं की, मृताच्या वडिलांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात मुलीचे वडील विजयपाल आणि तिचे दोन भाऊ कमल आणि रामवीर यांच्यावर सौरभला फाशी देऊन हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमाचा शेवट असा होईल असा विचार कुणीच केला नव्हता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world