- भारत सरकार के दूरसंचार विभाग ने सभी नए मोबाइल फोन में संचार साथी ऐप पहले से इंस्टॉल करने के निर्देश जारी किए
- मोबाइल कंपनियों को 90 दिनों के अंदर सभी नए हैंडसेट में संचार साथी ऐप इंस्टॉल करना अनिवार्य होगा
- संचार साथी ऐप मोबाइल फोन की असलियत जांचने, धोखाधड़ी रिपोर्ट करने और मोबाइल ब्लॉक करने में मदद करता है
केंद्र सरकारने देशातील टेलिकॉम सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि मोबाईल हँडसेटची सत्यता तपासण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने सर्व मोबाईल हँडसेट उत्पादक कंपन्यांना 90 दिवसांच्या आत त्यांच्या प्रत्येक नवीन मोबाईल फोनमध्ये 'संचार साथी ॲप' (Sanchar Saathi App) प्री-इंस्टॉल करण्याचे निर्देश दिले आहेत.
संचार साथी ॲपचे काम आणि उपयोग
संचार साथी' पोर्टलची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आली होती. हे ॲप आणि पोर्टल सायबर सुरक्षिततेसाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी एक अत्याधुनिक प्लटफॉर्म मानले जाते. हे ॲप हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करण्याची, फसवणुकीसाठी पाठवलेल्या वेब लिंक्सची तक्रार करण्याची सुविधा देते.
युजरच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन जारी झाले आहेत, हे तपासण्यात तसेच हँडसेटची सत्यता आणि संदिग्ध संवाद किंवा स्पॅमची तक्रार करण्यात मदत करते. या ॲपचे तंत्रज्ञान खूप प्रगत असल्याने, युजरला तक्रार करताना IMEI नंबर लक्षात ठेवण्याची गरज नसते. या ॲपद्वारे भारतीय नंबरवरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल्सची तक्रार करण्यासाठी ओटीपीची देखील आवश्यकता नसते.
(नक्की वाचा- दक्षिण मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; MMRDA चा नवा प्रकल्प ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक कोंडी फोडणार)
ॲपच प्रभाव आणि आकडेवारी
संचार साथी ॲपने आतापर्यंत लाखो लोकांची मदत केली आहे. ॲपच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत 42 लाखांहून अधिक मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. 26 लाखाहून अधिक हरवलेले किंवा चोरी झालेले हँडसेट शोधण्यात यश आले आहे. गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवर (Apple Store) मिळून 1.14 कोटींहून अधिक रजिस्ट्रेशन झाले आहेत.
सरकारचे निर्देश
दूरसंचार विभागाने दिलेल्या निर्देशात स्पष्टपणे म्हटले आहे की, डुप्लिकेट किंवा बनावट IMEI असलेले हँडसेट सायबर सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करतात. उत्पादक आणि आयातदारांनी हे सुनिश्चित करायचे आहे की, हे ॲप प्रथम वापर किंवा डिव्हाइस सेटअप करताना वापरकर्त्यांना सहज दिसेल आणि ते बंद किंवा अनइंस्टॉल करता येणार नाही.
जर कंपन्या या नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्या, तर दूरसंचार अधिनियम 2023 आणि दूरसंचार सायबर सुरक्षा नियम 2024 च्या कायद्यांनुसार कारवाई केली जाईल.
(नक्की वाचा- Cute VIDEO: मुलीने दाखवली 'कोरियन हार्ट' साईन; वडिलांच्या रिअॅक्शनने जग जिंकलं, व्हिडीओ व्हायरल)
काँग्रेसकडून तीव्र विरोध
दूरसंचार विभागाच्या या निर्देशानंतर काँग्रेसने या निर्णयावर सोमवारी आक्षेप घेतला. काँग्रेसचे सरचिटणीस *के.सी. वेणुगोपाल यांनी हा निर्णय असंवैधानिक असल्याचे सांगत तो त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. वेणुगोपाल म्हणाले की, "प्री-इंस्टॉल केलेले सरकारी ॲप, जे काढता येत नाही, हे प्रत्येक भारतीयावर 'पाळत ठेवण्याचे एक दडपशाहीचे साधन आहे. हे प्रत्येक नागरिकाच्या हालचालींवर, संभाषण आणि निर्णयावर नजर ठेवण्याचे एक माध्यम आहे."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world