जाहिरात
Story ProgressBack

सानिया मिर्झा मोहम्मद शमी बरोबर लग्न करणार? सानियाचे वडिल काय म्हणाले?

टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी हे लग्न करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे.सानिया मिर्झा हीचे वडील इमरान मिर्झा यांनी एनडीटीव्हीला सत्य काय आहे याची माहिती दिली आहे.

Read Time: 2 mins
सानिया मिर्झा मोहम्मद शमी बरोबर लग्न करणार? सानियाचे वडिल काय म्हणाले?
नवी दिल्ली:

Sania Mirza MARRYING Indian Cricketer Mohammed Shami? टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी हे लग्न करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही याबाबत बोललं जात आहे. त्यामुळे या दोघांचेही चाहते संभ्रमात पडले आहेत. हे दोघे लग्न करणार आहेत की नाहीत असा प्रश्न त्यांना पडला आहे. ही चर्चा होत असतानाच सानिया मिर्झा हीचे वडील इमरान मिर्झा यांनी एनडीटीव्हीला सत्य काय आहे याची माहिती दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे आता विभक्त झाले आहेत. तर मोहम्मद शमी ही त्याची पत्नी हसीनापासून वेगळा राहात आहे. सानिया दुबईतून आता भारतात शिफ्ट झाली आहे. त्यात आता शमी आणि सानियाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.याबाबत सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सानिया आणि शमी यांच्या लग्नाच्या बातम्या ह्या निव्वळ अफवा आहेत. सानिया आणि शमी हे कधीही भेटले सुद्धा नाहीत. अशा वेळी लग्नाची चर्चा कशी केली जावू शकते असेही ते म्हणाले आहेत.हे वक्तव्य करत त्यांनी सानिया शमीच्या लग्नाच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.   

ट्रेंडिंग बातमी - तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्णचं राहीलं, शेतकऱ्याच्या लेकीचं टोकाचं पाऊल

सानिया नुकतीच हज यात्रेसाठी गेली आहे.याबाबतची माहिती सानियाने ट्वीटरवर दिली आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर हजला जाण्याची संधी मिळाली असे तिने म्हटले आहे. काही काळ आपण मक्कामध्ये  असणार आहे असेही तिने सांगितले आहे. त्यात तिने पुढे असे लिहीले आहे की माझ्या प्रिय मित्रांनो, मी एका नव्या अनुभवाची तयारी करत आहे. मी सगळ्यांची माझ्या सर्व चुकांसाठी माफी मागत आहे.मी खूप भाऊक झाली आहे. मला विश्वास आहे अल्लाह माझी प्रार्थना स्विकार करेल आणि मला मार्गदर्शन करेल. 

ट्रेंडिंग बातमी -  NDTVच्या बातमीची दखल, 'त्या' धोकादायक व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल; अज्ञात तरुण-तरुणीचा शोध सुरू 

सानिया मिर्झाने पुढेही आपले मत व्यक्त केले आहे.त्यात ती म्हणते की मी भाग्यवान आहे.कृपया तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. मी जीवनातील एका महत्वाच्या यात्रेवर निघाली आहे. मला विश्वास आहे की मी एक चांगली व्यक्ती आणि मजबूत विश्वासाने परत येईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
आजही तिहारमधून सुटका नाहीच, दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांच्या जामीनावर स्थगिती
सानिया मिर्झा मोहम्मद शमी बरोबर लग्न करणार? सानियाचे वडिल काय म्हणाले?
Who is yoga-guru-swami-sivananda-is-practicing-yoga-daily-even-at-the-age-of-127-know-about-him
Next Article
कोण आहेत 127 वर्षांचे योग गुरु स्वामी शिवानंद ? PM मोदी देखील आहेत फॅन
;