सानिया मिर्झा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते ही त्याला मोठा प्रतिसाद देत असतात. ती मुंबईत आली की तिची खास मैत्रिण फराह खान हिला भेटल्या शिवाय ती जात नाही. या दोघींच्या मैत्रीचे किस्से सगळीकडे माहित आहे. आता या दोघींची एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्या दोघींनी थेट टेनिस कोर्टवरच डान्स केला आहे. नेटकऱ्यांनीही या डान्सला डोक्यावर घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठुमक ठुमक हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर दिल्लीपासून अगदी गल्ली पर्यंत सर्वच जण रिल बनवताना दिसले. त्याचे अनेक व्हिडीओ ही व्हायरल झाले. त्यात आता टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला ही या गाण्यावर रिल बनवण्याचा मोह आवरता आला नाही. तिने चक्क टेनिस कोर्टवरच याचा रिल बनवला. त्यात तिला साथ मिळाली ती फराह खान हिची. दोघींनी ही या गाण्यावर भन्नाट डान्स केला.
याला जवळपास आठ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. शिवाय हजारो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत.अनेकांना हा डान्स आवडला आहे. या दोघींचेही नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. यात अनेकांनी सानिया तू छान दिसत आहेस असं म्हटलं आहे. तर काही जण सानिया छान डान्स करत आहे असं ही म्हटलं आहे. अनेकांनी या गाण्यावर लव्ह लाईक करत आपल्या पसंतीची मोहर उमटवली आहे. हे गाणं आता चांगलंच व्हायरल होत आहे. जेव्हा मी त्यांना पिकलबॉल खेळायला सांगितले तेव्हा हेच घडते असं या व्हिडीओवर सानियाने म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world