- उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात नववधू किन्नर असल्याचे समजल्याने वराला मानसिक धक्का बसला
- मुकेश आणि सीमा यांचे लग्न मोठ्या थाटात पार पडले, पण सुहागरातच्या दिवशी सत्य उघड झाले
- नववधूच्या घरच्यांनी माहिती लपवून ठेवल्याचा आरोप करून मुकेशने फसवणुकीची तक्रार पोलिसांत केली
लग्नाचे सोहळे मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर आयुष्याची नवी स्वप्ने पाहणाऱ्या एका तरुणाला सुहागरातच्या दिवशी मोठा मानसिक धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. ज्या तरुणीसोबत सप्तपदी घेतल्या, ती प्रत्यक्षात मंगलामुखी म्हणजे किन्नर असल्याचे वराला समजले. या प्रकारानंतर पीडित कुटुंबाने पोलिसांत धाव घेत सासरच्या मंडळींविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या मांडवात ज्यांच्यासोबत संसार थाटण्याच्या आणाभाका घेतल्या, तीच व्यक्ती फसवणूक करेल अशी पुसटशी कल्पनाही या तरुणाला नव्हती. मैनपुरी जिल्ह्यात लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री एका वराच्या पायाखालची जमीन सरकली. आपली पत्नी स्त्री नसून किन्नर असल्याचे समोर आल्याने या तरुणाने कपाळावर हात मारून घेतला.
मैनपुरीच्या किशनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या मुकेशचे (नाव बदललेले) लग्न बिछवां भागातील एका तरुणीशी झाले. हे लग्ना 25 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात पार पडले. 26 मार्च रोजी नववधू सासरी आली. रितीरिवाजानुसार तिच स्वागत करण्यात आलं. दोन दिवसांनी जेव्हा पती-पत्नीची पहिली रात्र (सुहागरात) होती, तेव्हा मुकेशला पत्नीच्या शारीरिक स्थितीबद्दल संशय आला. चौकशीअंती ती किन्नर असल्याचे स्पष्ट झाले. हा त्याच्यासाठी मोठा धक्का होता. त्याला सत्य समजल्यानंतर त्याच्या पायाखालची वाळू सरकली.
मुकेशने ही माहिती आपल्या कुटुंबाला दिल्यानंतर दोन्ही बाजूंनी वादावादी झाली. दरम्यान, संबंधित पत्नी घरातील सर्व दागिने घेऊन माहेरी निघून गेल्याचा आरोप मुकेशने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मुकेश आणि सीमा (नावे बदललेली) यांचे लग्न 25 मार्च रोजी धुमधडाक्यात झाले. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, सुहागरातच्या दिवशी मुकेशसमोर सत्य आले आणि आनंदाचे रूपांतर दुखात झाले. पीडित तरुणाच्या मते, मुलीच्या घरच्यांनी ही माहिती मुद्दाम लपवून ठेवली. त्याची फसवणूक केली. जेव्हा त्याने जाब विचारला, तेव्हा मुलीकडील मंडळींनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
एवढेच नाही तर, आपली पोलखोल झाल्याचे लक्षात येताच नवरीने सासरचे सर्व दागिने गोळा केले आणि ती माहेरी पळून गेली. आता न्यायासाठी मुकेशने पोलीस स्टेशन गाठले असून, सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सत्य समोर येताच नवरी सासरी न थांबता दागिने घेऊन माहेरी निघून गेली. पीडित मुकेशने आता किशनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. "माझी आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक करून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे," असे मुकेशने तक्रारीत म्हटले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world