Operation Sindoor : 'धन्यवाद मोदीजी, माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला'; पहलगाम हल्ल्यातील पीडित महिलांना अश्रू अनावर

पहलगाममध्ये कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. देशातून दहशतवाद दूर करा अशी मागणी या पीडित कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय सैन्याने 'सिंदूर ऑपरेशन' राबवत भारतीय महिलेंचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा बदला घेतला आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबातील कर्ता पुरुषांची हत्या केली. यामुळे कित्येक मुलांनी आपल्या डोक्यावरील बापाचा हात गमावला तर कित्येक महिलांचं कुंकू पुसलं गेलं. आज भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करीत बदला घेतला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पहलगाममध्ये कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. पाकिस्तानला धडा शिकवा आणि दहशतवाद दूर करा अशी मागणी या पीडित कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Operation Sindoor : 'ही कारवाई अतिशय नेमकी, मोजकी अन्...' संरक्षण मंत्रालयाची हल्ल्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती

पुण्यातील संगीता गणबोटे यांनीही भारतीय आर्मीने केलेल्या ऑपरेशन  सिंदूरबद्दल आभार मानले आहेत. याला सिंदूर असं नाव देऊन त्यांनी महिलांचा सन्मान केल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. या हल्ल्याला 15 दिवस लोटले. मात्र असा एकही दिवस गेला नाही की मला त्यांची आठवण आली नसेल. आजही तो दिवस आठवून मला रडू येतं असंही त्या पुढे म्हणाल्या.  

Advertisement

पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे यांच्या मुलीनेही ऑपरेशन सिंदूरनंतर प्रतिक्रिया दिली आहे. सिंदूर नाव वाचूनच मला खूप रडायला आलं. पहलगाम हल्ल्यात महिलांचं कुंकू पुसलं गेलं होतं. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमुळे हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना आज खरी श्रद्धांजली मिळाली आहे. 

पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. त्यांनी माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला याचं मला समाधान असल्याचं त्या म्हणाल्या. मी त्यांना काहीही म्हणायला लहान आहे. पण आमच्या कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता आणि त्यांनी आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला.  

Advertisement