Smriti Mandhana-Palaash Muchhal Wedding Cancellation: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध गायक-संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न मोडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती लग्नसमारंभांना सुरूवात झाल्यानंतरच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आणि हे लग्न मोडलं होतं. मात्र नेमकं काय झालं, ज्यामुळे हे लग्न मोडलं हे अद्याप जगाला कळालेलं नाही. स्मृतीच्या पालपणीच्या मित्राने एक दावा केला असून त्याने लग्न का मोडलं यामागच्या घटना सांगितल्या आहेत.
लग्न का मोडले ? प्रश्नाचे अद्याप उत्तर नाही
स्मृती मंधाना आणि गायक-संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न मोडले हे अनेक जाहीर करण्यात आले नव्हते. लग्नसमारंभ सुरू असतानाच अचानक सगळ्या गोष्टी बिनसल्या आणि हे लग्न होणार नाही हे स्पष्ट झाले होते. मात्र असं काय झालं ज्यामुळे स्मृती आणि पलाशचे लग्न मोडले हा प्रश्न अनेकांना सतावतो आहे. स्मृती आणि पलाश हे एकमेकांच्या प्रेमात होते आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्न मोडल्यानंतर अनेक दिवसांनी अभिनेता आणि निर्माता विज्ञान माने याने पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केले आहेत. पलाशने केवळ स्मृतीचीच फसवणूक केली नाही, तर आर्थिक घोटाळाही केल्याचा आरोप विज्ञान याने केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
23 नोव्हेंबरला होणार होते स्मृती आणि पलाशचे लग्न
स्मृती आणि पलाश यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. मात्र, ऐनवेळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली. त्यानंतर लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिसेंबर 2025 मध्ये स्मृती आणि पलाशचे लग्न मोडल्याची बातमी धडकली. याबद्दल बोलताना विज्ञान माने याने लग्न मोडण्यामागे कोणत्या घटना कारणीभूत होत्या हे सांगितले आहे. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने यासंदर्भात दावे केले आहेत.
लग्नघरातच सुरू होती पलाशची लफडी ?
विज्ञान माने याने दावा केला आहे की, लग्न विधी सुरू असताना पलाश मुच्छल हा दुसऱ्या एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडला होता. भारतीय महिला क्रिकेट संघातील काही क्रिकेटपटूंनी पलाशला तिथेच चोपलं होतं असा दावाही विज्ञानने केला आहे. याच घटनेमुळे स्मृती आणि पलाशचे लग्न मोडले असं विज्ञानचे म्हणणे आहे.
आर्थिक फसवणुकीचा आरोप
विज्ञान माने हा स्मृतीचा बालपणीचा मित्र असून स्मृतीच्या माध्यमातून त्याची आणि पलाशची ओळख झाली होती. विज्ञान याने पलाशच्या एका चित्रपटासाठी पैसे उभे केले होते. पलाशने आपली 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आता विज्ञानने आरोप केलाय. पलाशचे संपूर्ण कुटुंब हे पैशांच्या बाबतीत लबाड आहे असा आरोप विज्ञान याने केला आहे. लग्न मोडल्यानंतर मुच्छल कुटुंबाने माझ्याशी असलेला सगळा संपर्क तोडला. मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक करण्यात आले, असं विज्ञान याने म्हटलं आहे. चित्रपटात काम केलेल्या इतर तंत्रज्ञांचे आणि कलाकारांचे मानधनही पलाशने दिलेले नाही असेही आपल्याला समजल्याचे विज्ञान याचे म्हणणे आहे. पलाश मुच्छलने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून त्याच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world