जाहिरात

Video: प्रसिद्ध मॉडेलने 'त्या' कॉलेजमध्ये केला अश्लील डान्स! विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीमुळे नको ते घडलं...

Belly Dancer Video Viral :  फरीदाबादच्या अग्रवाल कॉलेजमध्ये परदेशी डान्सरने बोल्ड बेली डान्स करून विद्यार्थ्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. बेली डान्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Video: प्रसिद्ध मॉडेलने 'त्या' कॉलेजमध्ये केला अश्लील डान्स! विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीमुळे नको ते घडलं...
Woman Belly Dance Viral Video
मुंबई:

Belly Dancer Video Viral :  फरीदाबादच्या अग्रवाल कॉलेजमध्ये परदेशी डान्सरने बोल्ड बेली डान्स करून विद्यार्थ्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. बेली डान्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनेक सामाजिक संस्थांनी या प्रकरणाला विरोध केला असून कॉलेजच्या अध्यक्षांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली जात आहे. संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी हे प्रकरण एसडीएमकडे सोपवण्यात आलं आहे. बेली डान्सरच्या अशा कृ्त्यामुळे समाजात चुकीचा मेसेज पसरतो, असं तक्रारदारांचा म्हणणं आहे. 

मॉडेल्सचा बेली डान्स सुरु होताच विद्यार्थ्यांनी केला गोंधळ

या जिल्ह्यातील बल्लभगढ येथील अग्रवाल कॉलेजमध्ये परदेशी डान्सरने केलेल्या बेडी डान्सचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. कॉलेजमध्ये इंटरनॅशनल कल्चरल अवेअरनेस प्रोगाममध्ये 16 देशांच्या फिमेल मॉडेल्सने '52 गज का दामण पहनुंगी, मटक के चलूंगी' अशा गाण्यांवर रॅम्पवॉक करून अश्लील डान्स केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी सुरु केली. पण पोलीस कर्मचाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात तारेवरची कसरत करावी लागली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले DC विक्रम सिंग आणि JCP राजेश दुग्गल सोफ्यावरून उठले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

नक्की वाचा >>  महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक गाजणार! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपचा मोठा मंत्री रिंगणात

बेली डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिवाचक एकता मंचने या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. या संघटनेचे महासचिव कैलाश शर्मा यांनी म्हटलंय की, विद्येच्या मंदिरात असं घडलं नाही पाहिजे. विद्यार्थ्यांसमोर अशाप्रकारचा डान्स करणं चुकीचं आहे. दरम्यान, या शो साठी 16 देशांचे मॉडेल्स आणि डान्सर अग्रवाल कॉलेजमध्ये उपस्थित झाले होते. या कार्यक्रमात भारतासह,रशिया, कर्गिस्तान,कझाकिस्तान, इजिप्त, न्यूझीलंड, एस्टोनिया, कोरिया, अमेरिकेसह 16 देशांच्या कलाकारांनी सहभाग घेतला होता. भाजप नेता गोपाल शर्मा,बल्लभगडचे आमदार मूलचंद शर्मा यांचे भाऊ टिपर चंद शर्माही उपस्थित होते.

नक्की वाचा >> Video:पतीला ट्रेनमध्ये धक्का देत मारहाण केली..मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीनं परप्रांतीय महिलेला धू धू धुतलं!

इथे पाहा बेली डान्सरचा व्हायरल व्हिडीओ

Listen to the latest songs, only on JioSaavn.com