
Ajit Pawar vs Murlidhar Mohol : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीची रणधुमाळी येत्या 2 नोव्हेंबरला सुरु होणार आहे. या निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (MOA) अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही (महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. म्हणजेच ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकीसाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ या दोघांनीही अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्य सरकारमध्ये प्रभावीपणे भूमिका मांडणारे नेते म्हणून अजित पवार यांना ओळखलं जातं. अजित पवार या निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा उतरल्याने या संघटनेवर त्यांचा प्रभाव आणखी वाढेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर दुसरीकडे भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल करून स्पोर्ट्स पॉलिटिक्समध्ये नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. या दोन्ही नेत्यांचा क्रिडा क्षेत्राशी असलेला संपर्क आणि त्यांच्या मतदारसंघावर असलेली पक्कड लक्षा घेता, ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे.
नक्की वाचा >> Video:पतीला ट्रेनमध्ये धक्का देत मारहाण केली..मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीनं परप्रांतीय महिलेला धू धू धुतलं!
60 मतदार, पण खेळ मोठा!
ऑलिम्पिक संघटनेच्या या निवडणुकीत एकूण 60 मते निर्णायक ठरणार आहे. या मतांचे अधिकार विविध जिल्हा क्रिडा संघटनांच्या प्रतिनिधींना दिलेले आहेत. यापैकी अनेक संघटनांवर मागील काही वर्षांपासून राजकीय सावट असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी कबड्डी आणि खो-खो संघटनांच्या निवडणुकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये बदल आणि मतांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय घडतंय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार क्रिडा क्षेत्रात आधीपासून सक्रीय आहेत. बारामतीपासून पुण्यापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्रीडा उपक्रम राबवले जातात.
तर मोहोळ पुण्याचे महापौर असताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या स्पर्धकांचाही पाठपुरावा केला होता. मोहोळ यांना क्रिडा क्षेत्राची आवड असल्याने ते निवडणूक लढवत असल्याचं म्हटलं जात आहे. दोन्ही बाजूंनी मतदार संघटनांशी संपर्क मोहीम आणि रणनीती बैठका सुरू आहेत.
नक्की वाचा >> Optical illusion Test :झाडावर बिबट्या दिसतोय? पण एक मासाही लपलाय, दिसला नसेल तर क्लिक करून बघा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world