दिल्ली पोलिसांनी 'स्पायडरमॅन'चे कपडे घालून स्टंट करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. स्टंट करताना त्याच्यासोबत त्याची मैत्रिण देखील होती. तिने देखील स्पायडर वुमनचे कपडे घातले होते. या दोघांच्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
बाईकवर स्टंट करत असताना दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं. या व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीच्या नजफगड परिसरातील ही घटना आहे.
(नक्की वाचा- कोट्यवधी कारचे रिक्षात रूपांतर, व्हिडीओ इंटरनेटवर VIRAL)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, संबंधित तरुण आणि तरुणी हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करत होते. या व्हिडीओत दिसत असलेल्या त्यांच्या बाईकला नंबर प्लेट देखील नव्हती. दोघेजण बाईक टायटॅनिक पोझ देत आहेत. तर हा स्पायडरमॅन देवाला नमस्कार करतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांचा शोध सुरु केला.
दोघांनीही स्पायडरमॅनचे कपडे घातले असल्याने त्यांचे चेहरे देखील दिसत नव्हते. तरीदेखील काही दिवसातच पोलिसांनी दोघांनाही शोधून काढलं आणि दोघांविरोधात कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य (२० वर्ष) आणि अंजली (१९ वर्ष) अशी दोघांची नावे आहेत.
(नक्की वाचा - देशभरातील WhatsApp बंद होणार? वाचा कंपनीनं कोर्टात काय सांगितलं?)
वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवरही कारवाई केली. बाईक चालवताना दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं. बाईकला नंबर प्लेट देखील नव्हती, बाईकला साईड मिरर देखील नव्हते, महत्त्वाचं म्हणजे बाईक चालवणाऱ्या तरुणाकडे लायसन्सदेखील नाही. या सर्व नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मोटर वेहिकल अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world