आलिशान आणि आरामदायी प्रवासाचा आनंद लुटता यावा म्हणून लोक आलिशान गाड्या खरेदी करतात, पण भारतात आलिशान गाड्यांचा प्रयोग करणाऱ्यांची कमी नाही. कुणी गाडीचा पुढचा भाग उचलून आपल्या रिक्षाला जोडतो, तर कुणी महागडी गाडीचं रुप बदलून टाकतं. खराब रस्त्यावर आणि अवघड वाटांवरून सहज जाता यावे म्हणून लोक महागडी वाहने खरेदी करतात. मात्र एका व्यक्तीने या महागड्या कारची जी अवस्था केली आहे ते पाहून तुम्हालाही हसू येईल. आकाश पांचाळच्या अशाच एका महागड्या कारचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
चक्क कारचे टायर बदलले !
रेंज रोव्हर ही एक अलिशान गाडी आहे. रस्ते कितीही खराब असले तरी रेंज रोव्हर प्रत्येक प्रवास सोपा करते. पण रेंज रोव्हरमध्ये इतर टायर बसवले तरी ती तोच परफॉर्मन्स देईल का? विशेषतः जर टायर फक्त लोखंडाचे बनलेले असतील तर. आकाश पांचाळ नावाच्या व्यक्तीने रेंज रोव्हरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता की रेंज रोव्हरच्या गाडीली चक्क बैलगाडीचे लोखंडी टायर बसवण्यात आले आहेत. गाडीचे टायर पुढे मागेही फिरत आहे. हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओमध्ये रेंज रोव्हरचे रिक्षात रूपांतर केले असं बोलल्याचे ऐकू येत आहे.
व्हायरल व्हिडीओ :-
युजर्सच्या कमेंटला वाव नाही
रेंज रोव्हरच्या या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 41 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हे पाहून एका युजरने कमेंट केली की हे फक्त भारतातच होऊ शकते. एका युजरने लिहिले की, तो प्रयोग करणारा भारी ड्रायव्हर आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, आता हे लोक शोधत येतील. एका यूजरने लिहिले की, या भावाला लक्झरी बैलगाडी हवी होती, म्हणून त्याने ती बनवली असावी.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world