जाहिरात

NEET UG Paper Leak- नीट-युजीचा पेपर फुटला कसा ? CBI आणि NTA ला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुप्रीम कोर्टात NEET-UG पेपर लीक प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले की, परीक्षेचे पावित्र्य भंग जाले तर पुन्हा परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश दिला जाऊ शकतो, मात्र या परीक्षेला 23 लाख विद्यार्थी बसले होते हे विसरता कामा नये. 

NEET UG Paper Leak- नीट-युजीचा पेपर फुटला कसा ? CBI आणि NTA ला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
सुप्रीम कोर्ट में दायर हलफनामे में नीट-यूजी परीक्षा रद्द करने का विरोध किया था...
नवी दिल्‍ली:

नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत सदर प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती न्यायालयापुढे मांडण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी गुरुवारपर्यंत वेळ देण्यात आला असून गुरुवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे. सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्था आणि केंद्र सरकारकडे या पेपरफुटीसंदर्भात काही प्रश्नांची उत्तर देण्यास सांगितले आहे. ही उत्तरे न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालय ही परीक्षा पुन्हा घ्यायची की नाही याबाबतचा आदेश देणार आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी काही प्रश्न विचारले. या परीक्षेचा पेपर लीक कसा झाला ? हा पेपर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे लीक करण्यात आला आहे का ? पेपर लॉकरमधून बाहेर कधी काढण्यात आले होते? परीक्षा कुठल्या वेळी झाला ? असे प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारले. परीक्षेचे पावित्र्य भंग जाले तर पुन्हा परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश दिला जाऊ शकतो असे न्यायालयाने म्हटले आहे. 

पेपर फुटला हे स्पष्ट आहे

नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी, विद्यार्थ्यांना मिळालेल्या पैकीच्या पैकी गुणांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सुनाणी घेत असताना सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला की या प्रकरणी किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. NTA ने उत्तरादाखल म्हटले की एक एफआयआर पाटण्यात दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयाने विचारले की याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की 6 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यावर न्यायालयाने परवानगी दिल्यास आपण सगळी माहिती न्यायालयासमोर सादर करू असे एनटीएतर्फे सांगण्यात आले. 

पेपर फुटला कसा ?

न्यायालयाने तपास यंत्रणा तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA ला उद्देशून म्हटले की आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की पेपर फुटला कसा > पेपर फुटीचा प२टर्न काय आहे? याचे जाळे कुठवर पसरले आहे, कारण या परीक्षेच्या निकालावर 24 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. पुन्हा नीटची परीक्षा घेण्याचा आदेश द्यायचा असल्यास आम्हाला सगळ्या बाबींची काळजीपूर्वक तपासणी करावी लागेल असे सरन्यायाधीशांनी म्हटले. 

पेपर लीक करणाऱ्यांविरोधात काय कारवाई केली?

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि एनटीएला सवाल विचारण्यात आला की, पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांविरोधात आणि पेपरफुटीच्या लाभार्थ्यांविरोधात काय कारवाई करण्यात आली आहे. या पेपर फुटीच्या सगळ्या लाभार्थ्यांची ओळख पटली नसेल तर मग ही परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे सरन्यायाधीशांनी म्हटले. ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते अशा 1563 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पेपरफुटीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांचा आपण शोध लावू शकलो आहे का ? जर तो लागला नसेल तर मग ही परीक्षा रद्द करून नीटची परीक्षा पुन्हा घ्यावी लागेल असे सरन्यायाधीशांनी म्हटले. त्यामुळे आम्हाला सगळी माहिती सादर करावी असे आदेश देण्यात आले आहेत. 

नीट परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले होते, यावरून सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला आहे की गुण देण्याची पद्धत नेमकी कशी आहे? सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकरणी बहु अनुशासनात्मक समितीचे गठण करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले. ही परीक्षा देशातील सगळ्यात महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी परीक्षा असते असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने  या प्रकरणाचे गांभीर्य किती आहे हे दाखवून दिले. 

फॉरेन्सिक डेटा विश्लेषण केले जाऊ शकते का?

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, केंद्राकडून सूचना घेतल्यानंतर या प्रकरणात फॉरेन्सिक डेटाचे विश्लेषण करता येईल अथवा नाही हे न्यायालयाला सांगण्याचे निर्देश दिलेत. पेपर फुटीचा परिणाम सगळ्या परीक्षेवर झालाय का ? आणि पेपर फुटीच्या लाभार्थ्यांची ओळख पटवणे शक्य आहे का? या दोन प्रश्नांची उत्तरे शोधणे सायबर फॉरेन्सिक विभागातील डेटा ॲनालिटिक्स प्रोग्रामद्वारे शक्य आहे का याचेही उत्तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून मागवले आहे. 

अब्दुल्ला मोहम्मद फैज नावाच्या व्यक्तीनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की सीबीआय 6 प्रकरणांचा तपास करत आहेत. यातील एका प्रकरणात सीबीआयने स्वत: एफआयआर दाखल केली आहे. इतर गुन्हे हे राजस्थान, बिहार, झारखंड आणि अन्य राज्यांत दाखल करण्यात आले आहेत. यावरून हे कळू शकते की  नीटचा पेपर विविध राज्यांत लीक झाला होता आणि तो इतर राज्यांत वितरीत करण्यात आला होता.  बिहार, झारखंड, मुंबई, अहमदाबादमध्ये विविध तपास सीबीआय, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागासारख्या तपास यंत्रणा तपास करत आहे. विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध जालेल्या बातम्या पाहिल्या असता हे स्प,्टपणे कळून येते की, नीटचा पेपर फुटला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्कारली शरणागती?
NEET UG Paper Leak- नीट-युजीचा पेपर फुटला कसा ? CBI आणि NTA ला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Former Police Commissioner Parambir Singh's new allegations against Anil Deshmukh
Next Article
फडणवीसां बरोबर कोणा कोणाला अटक करण्याचे आदेश होते? परमबीर सिंहांचा नवा बॉम्ब