
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. याशिवाय मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचीही माहिती आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारताने केलेल्या हल्ल्यात जवळपास 110 दहशतवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरअंतर्गत 7 मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा मुदस्सर खादियान खास (अबू जुंदाल), जैश-ए-मोहम्मदचा हाफिज मुहम्मद जमील, जैश-ए-मोहम्मदचा मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी, लष्कर-ए-तोयबाचा खालिद उर्फ अबू आकाश आणि जैश-ए-मोहम्मदचा मोहम्मद हसन खान यांचा खात्मा झाला आहे.
दहशतवाद केवळ एका देशाचा प्रश्न नाही तर दहशतवादाची किड अख्खं जग पोखरू पाहत आहे. त्यामुळे केवळ भारतच नाही तर जगातील बलाढ्य देशांसमोर दहशतवादाचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षात तब्बल 15 दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लष्कर-ए-तोयबा (LeT) संबंधित हत्याकांड:
1. अबू कताल (फैसल नदीम) – मार्च 2025 मध्ये सिंध प्रांतातील झेलम येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला. तो राजौरी आणि रेसी येथील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता.
2. मौलाना काशिफ अली – फेब्रुवारी 2025 मध्ये खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वाबी येथे अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या निवासस्थानी गोळ्या घालून ठार केला. तो लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखेचा प्रमुख
आणि हाफिज सईदचा मेहुणा होता.
3. अकरम गाझी – नोव्हेंबर 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला. तो लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ कमांडर होता आणि भारताविरोधात कट रचण्यात सहभागी होता.
4. ख्वाजा शाहिद – नोव्हेंबर 2023 मध्ये पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याचे अपहरण करून नंतर त्याचा मृतदेह नियंत्रण रेषेजवळ सापडला. तो 2018 च्या सुंजवान हल्ल्याचा मास्टरमाइंड होता.
5. मौलाना जियाउर रहमान – सप्टेंबर 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला.
6. अदनान अहमद (अबू हंजाला) – डिसेंबर 2023 मध्ये कराची येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला. तो सीआरपीएफ कॉन्व्हॉयवर हल्ल्याचा मास्टरमाइंड होता.
7. रियाज अहमद – सप्टेंबर 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला.
8. राजुल्ला निजामानी उर्फ अबू सैफुल्ला - मे 2025 मध्ये पाकिस्तानातील सिंधमधील मतली फलकारा चौकाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहची गोळ्या घालून हत्या केली.
नक्की वाचा - Terrorist Killed: लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह खालिदची हत्या! भारतातील 'या 3 हल्ल्यांचा मास्टरमाईंड अन्...
जैश-ए-मोहम्मद (JeM) संबंधित हत्याकांड:
9. कारी एजाज आबिद – मार्च 2025 मध्ये पेशावर येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला. तो मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय होता.
10. दाऊद मलिक – ऑक्टोबर 2023 मध्ये उत्तर वझिरिस्तान येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला. तो लष्कर-ए-जबरचा संस्थापक आणि मसूद अझहरचा निकटवर्तीय होता.
11. जहूर इब्राहिम – मार्च 2022 मध्ये कराची येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला. तो IC-814 विमान अपहरण प्रकरणातील सहभागी होता.
इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित हत्याकांड:
12. बशीर अहमद पीर (हिजबुल मुजाहिदीन) – फेब्रुवारी 2023 मध्ये रावळपिंडी येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला.
13. परमजीत सिंग पंजवार (खलिस्तानी आतंकवादी) – मे 2023 मध्ये जोहर टाउन, लाहोर येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला.
ISI संबंधित हत्याकांड:
14. मुफ्ती शाह मीर – मार्च 2025 मध्ये बलुचिस्तानच्या तुरबत येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला. तो कुलभूषण जाधवच्या अपहरणात सहभागी होता.
15. मेजर दानियाल (ISI अधिकारी) – मार्च 2025 मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केला. तो 2016 च्या बारामुल्ला हल्ल्यात सहभागी होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world