जाहिरात

Pune News: पुणेकरांनो घाबरू नका! बिबट्या समोर आला तर काय करायचे, कोणती काळजी घ्यायची? फॉलो करा या टिप्स

Pune News: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्यामुळे दहशत पसरलीय. पण बिबट्या समोर आला तर न घाबरता काही गोष्टी केल्यास तो हल्ला करणार नाही.

Pune News: पुणेकरांनो घाबरू नका! बिबट्या समोर आला तर काय करायचे, कोणती काळजी घ्यायची? फॉलो करा या टिप्स
"Pune News: बिबट्या समोर आला तर काय करायचं?"
Canva

Pune News: पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड या तालुक्यांतमधील बहुतांशी क्षेत्र डोंगराळ असून यामध्ये पाटबंधारे विभागाचे मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्प आहेत. पीक पद्धती सिंचनाच्या उपलब्धततेमुळे बहुतांशी भागात ऊसशेती करण्यात येते. ऊसशेतीमुळे वन्यप्राणी बिबट्यास मुबलक भक्ष्य आणि पाण्याची उपलब्धतता होते तसेच लपण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळतो. शेती व्यवसायास जोडधंदा म्हणून करण्यात आलेल्या पशुपालन, कुक्कुटपालन आदी माध्यमातून भक्ष्य उपलब्ध होते.

बिबट-मनुष्य संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

बिबट नसबंदी, शेतीपंपाकरिता दिवसा वीज पुरवठा, माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या धर्तिवर स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन फोर्सकरिता अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणी, बिबट्यांचे इतर संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण, नवीन चार बिबट निवारा केंद्राची निर्मिती प्रस्तावित आहे. जुन्नर वन विभागात वाढलेला बिबट्याचा प्रादुर्भाव आणि बिबट-मनुष्य संघर्ष येत्या काळात संपवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

Latest and Breaking News on NDTV

बिबट्या दिसल्यास काय काळजी घ्याल?

  • बिबट्याचा पाठलाग करू नका.
  • बिबट्याला जखमी करू नका. बिबट्या घाबरुन उलट हल्ला करू शकतो.
  • मुलांनी घोळक्याने फिरावे. अंधारात एकटे फिरताना, परसाकडे जाताना गाणी म्हणा, बोला किंवा बरोबर रेडिओवर गाणी लावून बॅटरी घेऊन फिरावे.
  • रात्री उघड्यावर झोपू नये. विशेषतः मेंढपाळांनी झोपण्यासाठी बंदिस्त जागा करुनच झोपावे.
  • सायंकाळी व रात्री अनावधाने देखील एकट्याने बाहेर पडू नये. सोबतीने किंवा समूहाने वावरावे.
  • मुलांना एकटे सोडू नका. लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी.
  • गावाजवळील मोकाट कुत्रे, बकऱ्या आणि डुकरे यांची संख्या कमी करावी.
  • गुरे रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूने बंदिस्त राहील याची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांना बळी पडू नका.

Pune News : पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी हा व्हिडीओ बघाच! 'या' 2 सोसायट्यांमध्ये फिरतोय नरभक्षक बिबट्या

(नक्की वाचा: Pune News : पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी हा व्हिडीओ बघाच! 'या' 2 सोसायट्यांमध्ये फिरतोय नरभक्षक बिबट्या)

अचानक बिबट्या समोर दिसल्यास काय कराल ?

  • अजिबात घाबरू नका. शांत उभे राहा. पळून जाऊ नका. तुम्ही कितीही वेगाने पळालात तरी बिबट्यापेक्षा जास्त वेगाने पळू शकत नाही.

  • पळणाऱ्या शिकारीचा पाठलाग करणे हा बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव आहे, त्यामुळे तो हल्ला करू शकतो.
  • तुमचे दोन्ही हात वर उचला आणि जोरजोरात ओरडा. असे केल्यास बिबट्याला तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे प्राणी असल्याचा भास होतो.
  • जर बिबट्या जवळ असेल तर ओरडतच हळूहळू मागे सरका. जर तो दूर असेल तर शांतपणे हात वर करून मागे हटा.
  • झाडात किंवा झाडीत लपू नका. लपण्याचा प्रयत्न केल्यास बिबट्या तुम्हाला एखादा लहान प्राणी समजून हल्ला करण्याची शक्यता वाढते.
  • खाली वाकू नका कारण वाकल्यास तुम्ही लहान दिसता, ज्यामुळे हल्ला होऊ शकतो.

Pune News: बिबट्याची धास्ती; बड्या IT कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन जारी

(नक्की वाचा: Pune News: बिबट्याची धास्ती; बड्या IT कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन जारी)

बिबट्याचे अस्तित्व जाणवल्यास कार्यालयाच्या निंयत्रण कक्षाच्या 18003033 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com