Elon Musk India Visit: इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणारी कंपनी टेस्लाचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण भारतात येऊन ते नेमके काय करणार आहेत? इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रामध्ये (EV Sector) त्यांची कंपनी किती मोठी गुंतवणूक करणार आहे आणि भारतामध्ये गुंतवणुकीसाठी त्यांच्या काय योजना असणार आहेत? याबाबत अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही. पण न्यूज एजेंसी रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने इलॉन मस्क यांच्या भारताच्या प्लानबाबतची माहिती उघड केली आहे.
पुढील आठवड्यात इलॉन मस्क-PM मोदींची होणार भेट?
रॉयटर्सच्या माहितीनुसार, इलॉन मस्क पुढील आठवड्यामध्ये भारत दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहेत. यावेळ भेटीदरम्यान भारतामध्ये स्वतःच्या कंपनीची फॅक्टरी सुरू करण्यासाठी ते 200-300 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करू शकतात.
जगातील सर्वात मोठ्या ऑटो मार्केटच्या यादीमध्ये भारत देश तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि येथे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्येही वाढत होताना दिसत आहे. इलॉन मस्क यांनाही याच संधीचा फायदा करून घ्यायचा आहे.
रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्यासोबतच्या बैठकीदरम्यान इलॉन मस्क भारतामध्ये किती गुंतवणूक करणार आहेत, याबाबतची माहिती सांगू शकतात. पण ही गुंतवणूक कधीपर्यंत केली जाईल आणि फॅक्टरी देशाच्या कोणत्या राज्यामध्ये असेल, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
नव्या EV पॉलिसीमुळे टेस्लाचे मार्ग मोकळे
भारतामध्ये कित्येक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार-बाइकची निर्मित करताहेत, EV क्षेत्र भारतामध्ये अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि हुंदाई यासारख्या कंपन्या इलेक्ट्रिक कारची निर्मिती करताहेत. पण एकूण निर्मितीच्या तुलनते या कारचे मार्केट केवळ दोन टक्के इतके आहे. यामुळे भविष्यात भारतामध्ये इलेक्ट्रिकची कारची मागणी वाढण्याची शक्यता आहे. वर्ष 2030पर्यंत भारतात तयार केल्या जाणाऱ्या नव्या कारपैकी 30टक्के इलेक्ट्रिक कारचा समावेश असेल, असे लक्ष्य सरकारनेही ठेवले आहे.
दरम्यान इलॉन मस्क भारतामध्ये येणे, हा कोणताही योगायोग नाही. फार पूर्वीपासूनच भारतामध्ये त्यांना आपल्या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची विक्री करायची होती. पण धोरणांमधील कठोर अटींमुळे ते शक्य झाले नाही. या वर्षी मार्च महिन्यामध्ये सरकारने नवीन EV धोरण जाहीर केले, ज्यामुळे टेस्लासारख्या परदेशी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नव्या EV धोरणामध्ये काय आहे?
नव्या ईव्ही धोरणानुसार, ज्या इलेक्ट्रिक व्हेहिकल कंपन्या भारतामध्ये येऊन वाहनांची निर्मिती करू इच्छित आहेत, त्या कंपन्याकरिता काही अटी-शर्ती निश्चित करण्यात आल्या असून काही अटी शिथिल केल्या गेल्या आहेत. यानुसार आता ज्या कंपनीला भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करायची आहे, त्यांना किमान 4 हजार 150 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल तसेच कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा लादलेली नाही. तसेच ऑटो कंपन्यांना प्लाँट उभारून इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती तीन वर्षांमध्ये सुरू करावी लागेल.
कंपन्यांना पाच वर्षांच्या आतमध्ये डोमेस्टिक व्हॅल्यू ॲडिशन (DVA) 50% पर्यंत पोहोचवावे लागेल, म्हणजेच इलेक्ट्रिक वाहन्यांच्या निर्मितीसाठी लोकल सोर्सिंग वाढवावे लागेल. लोकल सोर्सिंग तिसऱ्या वर्षी 25% आणि पुढील पाच वर्षांमध्ये 50% पर्यंत वाढवावे लागेल.
पूर्वीच्या धोरणांमधील काही अटींमुळे टेस्ला कंपनीला भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कारची विक्री करण्यामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. पण आता नवीन धोरणांमुळे भारतामध्ये फॅक्टरी सुरू करण्याचा टेस्ला कंपनी मार्ग सोपा होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टेस्ला कंपनीचे शोरूम कुठे असेल?
रॉयटर्सच्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीने नवी दिल्ली आणि मुंबई शहरामध्ये आपल्या शोरूमकरिता जागा शोधण्यासाठी सुरुवात केली आहे. दुसरीकडे सूत्रांनी रॉयटर्संना दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने नवी दिल्ली येथे स्पेस स्टार्टअप्ससोबत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्येही इलॉन मस्क सहभागी होण्याची शक्यता आहे. मस्क हे स्वतः अमेरिकन स्पेस कंपनी स्पेसएक्सचेही मालक आहेत.
अमेरिका-चीनमधील मोठ्या बाजारपेठेमध्ये वाहनांची विक्री घटत असल्याच्या आव्हानांचा सामना टेस्ला कंपनी करत असताना, दुसरीकडे याचदरम्यान इलॉन मस्क भारत दौऱ्यावर येत आहेत. या दोन देशांमध्ये कंपनीने आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी किंमतीही कमी केल्या, पण समस्या काही केल्या कमी झाल्या नाहीत. परिणामी टेस्ला कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या निर्णयाची घोषणा केली, यानुसार 10 टक्के कर्मचाऱ्यांचा जॉब धोक्यात आला आहे.
आणखी वाचा
33 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला Microsoft नं एका झटक्यात काढलं! म्हणाला...
'बायकोला काही झालं तर सोडणार नाही,' इम्रान खानची जेलमधून लष्करप्रमुखांना धमकी