जाहिरात

CNAP Service : 'हॅलो! कोण बोलतंय' विचारायचं नाही, अनोळखी कॉल्सचे टेन्शन मिटले, काय आहे CNAP?

What Is CNAP Service? दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर एकत्रितपणे काम करत आहेत.

CNAP Service : 'हॅलो! कोण बोलतंय' विचारायचं नाही, अनोळखी कॉल्सचे टेन्शन मिटले, काय आहे CNAP?

CNAP Service India: तुम्हीही अनोळखी नंबरवरून येणाऱ्या स्पॅम (Spam) आणि फसव्या (Fraud) कॉल्समुळे हैराण झाला आहात का? जर हो, तर तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. वापरकर्त्यांची ही वाढती समस्या दूर करण्यासाठी भारत सरकार लवकरच एक अशी सेवा सुरू करत आहे, ज्यानंतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर अनोळखी नंबरसोबतच कॉल करणाऱ्या व्यक्तीचे खरे नाव देखील दिसेल. दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर एकत्रितपणे काम करत आहेत.

 TRAI आणि DoT ने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'कॉलिंग नेम प्रेझेंटेशन' (CNAP) नावाच्या या सुविधेमुळे मोबाइल वापरकर्त्यांना कोणत्याही कॉलसोबत कॉल करणाऱ्याचे खरे नाव आपोआप स्क्रीनवर दिसेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही सुविधा सर्व वापरकर्त्यांसाठी 'डिफॉल्ट' (Default) असेल, म्हणजेच ती आपोआप सुरू राहील. या फीचरमुळे वाढते बनावट कॉल, स्पॅम आणि स्कॅमपासून लोकांना वाचवणे सोपे होईल.

Bhandara News : पैशांसाठी फिल्मी स्टाईल हत्या, मित्रानेच मित्राचा काढला काटा

TRAIचा मोठा निर्णय

 TRAI च्या एका अहवालानुसार, DoT आणि TRAI चे म्हणणे आहे की, कॉल आल्यावर कॉल करणाऱ्याचे ते खरे नाव दिसेल, जे सिम कार्ड (SIM Card) घेताना केवायसी (KYC) कागदपत्रांमध्ये दिलेले आहे. TRAI ने ही सेवा केवळ ग्राहकांनी मागणी केल्यावरच (Opt-in) सुरू करावी, असे सुचवले होते. परंतु, DoT ने याचा आवाका वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला. ही सुविधा सर्वांसाठी डिफॉल्ट स्वरूपात सुरू असावी आणि ज्यांना ती नको असेल, त्यांनी ती बंद करण्याची विनंती करावी, यावर दोन्ही संस्थांनी सहमती दर्शवली आहे.

नवीन कॉलर आयडेंटिफिकेशन सुविधा सध्या ४जी आणि त्यापुढील नेटवर्कवर (4G and above) सुरू केली जाईल, ज्यामुळे कॉलरची ओळख त्वरित आणि अचूकपणे (Accurate) दिसून येईल. कॉल उचलण्यापूर्वीच कोण कॉल करत आहे, हे समजल्याने फसवणुकीची (Fraud) शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. TRAI आणि DoT ने हे देखील स्पष्ट केले आहे की, काही विशिष्ट लोकांचे नाव कॉल आल्यावर दिसणार नाही. 

नक्की वाचा - Ambernath News: डॉक्टर पत्नीच्या डोक्यात पतीने खलबत्ता घातला, हल्ल्यामागचे कारण ऐकून धक्का बसेल

ज्या वापरकर्त्यांनी कॉलिंग लाईन आयडेंटिफिकेशन रेस्ट्रिक्शन (CLIR) ही सुविधा घेतली आहे, त्यांची ओळख गुप्त (Secret) ठेवली जाईल. ही सुविधा सामान्यतः सुरक्षा किंवा गुप्तचर संस्थांच्या (Intelligence Agencies) अधिकाऱ्यांना आणि काही खास वापरकर्त्यांना दिली जाते. याशिवाय, बल्क कनेक्शन (Bulk Connection) धारक, कॉल सेंटर्स (Call Centres) आणि टेलीमार्केटर्सना (Telemarketers) या सुविधेचा लाभ मिळणार नाही, ज्यामुळे आवश्यक पारदर्शकता (Transparency) कायम राहील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com