
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 21 वर्षीय युवतीने ठरलेल्या लग्नापासून सुटका मिळवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाची खोटी कहाणी रचल्याचे उघड झाले आहे. या युवतीने आपल्या चेहऱ्यावर सॉस लावून रक्ताचे डाग भासवत धमकीचे फोटो आणि मेसेज पाठवले होते. ज्यामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तीन हे सर्व ठरलेलं लग्न मोडावं या उद्देशाने केले होतं. पोलीसांनी जेव्हा या मुलीचा शोध घेतला तेव्हा याबरोबरच अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
सबीहा (नाव बदललेले) नावाच्या या युवतीचे एका तरुणासोबत लग्न ठरले होते. मात्र तिला हे लग्न करायचे नव्हते. त्यामुळे 25 सप्टेंबर 2025 रोजी ती शाळेत जाण्याचे निमित्त करून घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती थेट लखनऊ येथे पोहोचली. तेथे तिने लग्नापासून वाचण्यासाठी फिल्मी स्टाइलमध्ये अपहरणाचा कट रचला. तिने अगोदरच चेहऱ्यावर सॉस लावून बनावट जखमांचे फोटो काढले होते. प्रवासात असताना तिने ते फोटो आणि धमक्यांनी भरलेले मेसेज होणाऱ्या सासऱ्यांना पाठवले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली.
धमकीच्या मेसेजमध्ये 'आता माझा सूड पूर्ण झाला आहे. 20 वर्षांपूर्वीच्या शत्रुत्वाचा बदला घेतला आहे,' असे लिहिले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसपी विनीत जयस्वाल यांनी पोलिसांची 5 पथके तपासासाठी नेमली. पोलिसांनी तातडीने तपास करून युवतीला करनैलगंज येथून सुखरूप ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, युवतीने आपल्याला हे लग्न करायचे नव्हते. हे लग्न तिच्या मर्जीच्या विरुद्ध होत होते. त्यामुळेच ही ही खोटी योजना आखल्याची कबुली तिने दिली. सततच्या कौटुंबिक दबावातून तिने हा मार्ग निवडल्याचे स्पष्ट झाले आहे.
नक्की वाचा - Pune News: एम. कॉम शिकलेला निलेश घायवाळ कसा बनला कुख्यात गुंड? कशी मिळवली एवढी संपत्ती?
पीडितेच्या आईला सुरुवातीपासूनच काहीतरी गड़बड असल्याचा संशय आला होता. त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मुलगी गुणपत्रिका जमा करण्यासाठी काही पैसे आणि पुस्तके घेऊन गेली होती. परंतु त्यानंतर ती गायब झाली. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर स्पष्ट झाले की, या संपूर्ण प्रकरणात कोणत्याही बाहेरील टोळीचा हात नव्हता. लग्नाचा दबाव टाळण्यासाठी युवतीनेच हे स्व-रचित षड्यंत्र रचले होते. गोंडा पोलिसांनी युवतीला यशस्वीरित्या ताब्यात घेतले असून, तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world