केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत (Union Budget 2026) असलेला सस्पेन्स आता संपला आहे. 1 फेब्रुवारी रोजी रविवार असला तरी, केंद्र सरकारने अर्थसंकल्पाची तारीख न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक आता समोर आले असून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी आपला नववा सलग अर्थसंकल्प सादर करतील.
2026 मध्ये 1 फेब्रुवारीला रविवार असल्याने अर्थसंकल्पाच्या तारखेबाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्स (CCPA) ने अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित केले असून, त्यात अर्थसंकल्पासाठी 1 फेब्रुवारीची तारीख पक्की करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात / राष्ट्रपतींचे अभिभाषण - 28 जानेवारी
- आर्थिक पाहणी अहवाल (Economic Survey) - 29 जानेवारी
- केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरण (Union Budget)- 1 फेब्रुवारी
निर्मला सीतारामन यांचा नवा इतिहास
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित करतील. निर्मला सीतारामन यांचा हा सलग नववा अर्थसंकल्प असेल. सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे, निर्मला सीतारामन आता त्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत.
(नक्की वाचा- Raj-Uddhav Thackeray Interview: ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र का आले? राज -उद्धव पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले)
रविवार असूनही अर्थसंकल्प का?
1 फेब्रुवारीला रविवार असतानाही सरकार तारीख बदलत नाही, कारण 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्ण व्हावी, असा सरकारचा मानस असतो. याआधी 2016 मध्येही 1 फेब्रुवारीला रविवार असताना अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. तसेच 2025 मध्ये तो शनिवारी सादर झाला होता. 1 फेब्रुवारी ही तारीख आता भारताच्या आर्थिक कॅलेंडरमध्ये फिक्स झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि उद्योगांना आधीच माहिती असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world