जाहिरात

Dancebar issue: ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली डान्सबार, आता कारवाईचा बडगा, कायद्यात दुरुस्ती ही होणार

राज्य शासनाने विविध वेळा कायदे आणि नियम तयार केले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या.

Dancebar issue: ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली डान्सबार, आता कारवाईचा बडगा, कायद्यात दुरुस्ती ही होणार
  • ऑर्केस्ट्रा बारवर कडक कारवाईची इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला
  • पनवेलमध्ये ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवले जात असून त्यात आक्षेपार्ह गोष्टी घडत आहेत
  • तीन वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास ऑर्केस्ट्रा बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करणार
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

Budget Session 2026: वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा-बारवर कडक कारवाई  करण्याबाबत कायद्यात लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा व डान्सबारविरुद्ध कारवाई करण्याचा मुद्दा आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात डान्सबार चाललात. त्यात आक्षेपार्ह गोष्टी होत असतात. म्हणायला ते ऑर्केस्ट्रा बार आहेत. पण ते नावाला असल्याचे भास्कर जाधव यांनी चर्चेच्या वेळी विधानसभेत सांगितले. 

नक्की वाचा - Beed News: दोन बहिणींच्या अपहरणाचा कट, छोट्या बहिणीचं जबरदस्त धाडस, 'असा' उधळला डाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली काही ठिकाणी डान्सबार चालवले जातात. अशा ठिकाणी कारवाई केल्यानंतरही पुन्हा त्याच प्रकारे व्यवसाय सुरु केला जातो. त्यामुळे राज्य शासनाने ठरवले आहे की तीन वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येईल. या अधिवेशनात किंवा पुढील अधिवेशनात यासंदर्भात आवश्यक दुरुस्ती प्रस्तावित केली जाईल.

नक्की वाचा - Maharashtra Dry Days 2026: होळी, मोहरम, गांधी जयंतीला आता 'ड्राय डे' नाही? NDTV मराठीचा Fact Check

या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिले आहेत. राज्य शासनाने विविध वेळा कायदे आणि नियम तयार केले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या. तरीदेखील राज्य शासनाने नव्याने नियम आखले असून त्यानुसार ऑर्केस्ट्रा बार चालवण्यासाठी विशिष्ट जागा, पार्टीशन, अल्कोहोलवरील निर्बंध आदी अटी घालण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पनवेल येथील प्रकरणाची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार भास्कर जाधव यांनी सहभाग घेतला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com