22 जुलैपासून केंद्रीय अर्थसंकल्पाला सुरूवात होणार आहे. यावेळी मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मुद्द्यांवरही होणार चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होईल. या बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैला सुरू होऊन 12 ऑगस्टला संपणार आहे. याशिवाय पंतप्रधान आज संध्याकाळी 6 वाजता भाजप मुख्यालयालाही भेट देऊ शकतात. यावेळी ते कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
नक्की वाचा - विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा! इंडिया आघाडीची सरशी
अर्थसंकल्पाव्यतिरिक्त या 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होऊ शकते...
1. अग्निवीर योजना
2. नीट पेपर लीक वाद
3. दहशतवादी हल्ले
4. रेल्वे अपघात
5. मणिपूर हिंसाचार
6. हाथरस चेंगराचेंगरी
अग्नीवीरः 1 जुलै 2024 रोजी राहुल गांधी लोकसभेत म्हणाले होते की, अग्निवीर सरकारसाठी यूज ॲण्ड थ्रो कामगार आहे. जवानांना सरकार ना पेन्शन, ना भरपाई, ना शहीद दर्जा दिला जातो. राहुलच्या या वक्तव्यानंतर या मुद्द्यावरून वाद सुरू झाला.
NEET UG: नीट पेपर लीक प्रकरणावरून विरोधक संसदेत आक्रमक होणार आहेत. कारण केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात पेपर लीक झालंच नसल्याचं प्रतिज्ञापत्र दिलंय.
दहशतवादी हल्ले : मागील महिनाभरात 6-7 दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यात जम्मू येथील रियासी येथे श्रद्धाळूंवर आणि कठुआ येथे हल्ले झाले आहेत. कठुआ तील हल्ल्यात पाच जवान शहीद झाले.
रेल्वे अपघात - पश्चिम बंगाल आणि ओरिसा मधील रेल्वे अपघात गंभीर मुद्दा आहे. यावरही विरोधक संसदेत प्रश्न उपस्थित करणार. त्यावर बैठकीत चर्चा होऊ शकते. सिलिगुडी येथील अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला होता.
मणिपूर हिंसाचार - कुकी आणि मैतई यांच्यात आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे तो अजूनही मिटला नाही. राहुल गांधी यांनी मणिपूरचा दौरा केला परंतु मोदींनी दौरा केल्या नसल्यामुळे संसदेत लक्ष्य करण्यात येईल. यावरही चर्चा होऊ शकते.
हाथरस चेंगराचेंगरीची घटना - युपीतील हाथरस चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तिथे योगी सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे. संसदेत हा मुद्दा मांडला जाणार आहे. त्यापूर्वी केंद्र सरकार उत्तर तयार ठेवणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world