जाहिरात
32 minutes ago

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच 11 एप्रिल रोजी रात्री पुण्यात आगमन झालं आहे. पुणे विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शाह यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते. अमित शाह आज रायगडावर जात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या निमित्ताने रायगडाच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Live Update : 'तहव्वूर राणाला फाशी द्या', माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची मागणी

तहव्वूर राणाला भारतात आणण्यावरुन मी मोठा का तू मोठा करण्यापेक्षा त्याला फाशी झाली पाहिजे अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. तहव्वूर राणा हा आपल्या देशाचा शत्रू आहे. त्याने 26/11 प्लॅन केला. आमच्या अनेक लोकांना ठार केले, हत्या केली. महाराष्ट्राला एक दुःखद अशी आठवण ठेवून गेला.

या दहशतवाद्याला भारत सरकारने म्हणजेच युपीए सरकार आणि भाजप सरकारने भारतात आणण्याचे प्रयत्न केले. त्याला आणताना मी मोठा का तू मोठा असं करण्यापेक्षा त्याला कशा तऱ्हेने फाशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं मत शिंदे यांनी व्यक्त केले. 

Live Update : धक्कादायक! अल्पवयीन परदेशी मुलीची पुण्यात विक्री

अल्पवयीन परदेशी मुलीची 3 लाख रुपयांना विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झाला आहे.  चंपा नावाच्या महीलेस तीन लाख रुपयांना अल्पवयीन बांगलादेशी मुलीची विक्री करण्यात आली होती. पुण्यातील तुळशीबाग परीसरातील एका खोलीत विक्री करण्यात आलेल्या मुलीला डांबून ठेवण्यात आले होते.  बांगलादेशी असल्यानं तू बाहेर गेलीस तर पोलीस तुझ्याविरोधात कारवाई करतील, अशी धमकी या मुलीला देण्यात आली होती. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Live Update : बँकेनं नोटीस पाठवताच शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, नांदेडमधील धक्कादायक प्रकार

नांदेड जिल्ह्यातील एका 40 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. सीमावर्ती धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी या गावची ही घटना आहे. हरिदास विश्मबर बोंबले असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

हरिदास यांनी किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुंडलवाडी येथून 22 मार्च 2018 साली 1 लाख 83 हजार रुपये कर्ज घेतले होते. हरिदास हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांनी शेतीच्या निमित्ताने ही कर्ज घेतले होते. मागील 7 वर्षात त्यांनी या कर्जाची परतफेड केली नाही. याबाबत बँकेने हरिदास यांना अनेकदा लेखी आणि तोंडी कर्ज वसुलीसाठी कळवले होते. त्यानंतर 13 फेब्रुवारी 2025 रोजी थकीत असलेल्या कर्जाबाबत स्मरणपत्र पाठवले होते.

यावेळी कर्जाची परतफेड न केल्यास कार्यवाही करण्याचे या स्मरणपत्रात नमूद करण्यात आले होते. अखेर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने आपल्याकडून कर्जाची परतफेड होत नाही या विवंचनेतून हरिदास यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

Live Update : LSG vs GT : लखनौनं टॉस जिंकला, मॅचपूर्वीच टीमला मोठा धक्का

आयपीएल 2025 मध्ये आज  लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants vs Gujarat Titans ) हा सामना होत आहे. या सामन्यात लखनौचा कॅप्टन ऋषभ पंतनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

हा सामना सुरु होण्यापूर्वीच लखनौला एक धक्का बसलाय. या सिझनमध्ये फॉर्मात असलेला मिचेल मार्श हा सामना खेळू शकणार नाही. मार्शची मुलगी आजारी आहे. तिच्या देखभालीसाठी तो हा सामना खेळणार नसल्याचं कॅप्टन ऋषभ पंतनं सांगितलं.

Live Update : वक्फ विरोधात सुरू असलेलं आंदोलन झाकायला तहव्वूर राणाला आणलं - अरविंद सावंत

Live Update : वक्फ विरोधात सुरू असलेलं आंदोलन झाकायला तहव्वूर राणाला आणलं - अरविंद सावंत

Live Update : रायगडावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह LIVE

Live Update : गृहमंत्री अमित शाह रायगड किल्ल्यावर रवाना

गृहमंत्री अमित शाह हे राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील समाधी स्थळी दर्शन घेऊन रायगड किल्ल्यावर रवाना 

सोबत खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगवले ही उपस्थित.

Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राजमाता जिजाऊ समाधीस्थळाचं घेतलं दर्शन

गृहमंत्री अमित शाह हे राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील समाधी स्थळी पोहचले असून अमित शाह राजमाता जिजाऊ समाधी स्थळी दर्शन घेतलं. 

Live Update : गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरचे पाचाड येथील हेलिपॅडवर आगमन

गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरचे पाचाड येथील हेलिपॅडवर आगमन

Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडसाठी रवाना

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडसाठी रवाना 

रिट्स कार्लटन हॉटेलमधून अमित शाह रायगडाकडे रवाना

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत

तिन्ही नेते अमित शाह यांच्यासोबत एकाच गाडीतून

Live Update : चिप्सचं आमिष दाखवत 9 वर्षीय मुलीवर अत्याचार

लातूरच्या उदगीर शहरातील नालंदा नगरमधील एका 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करत विनयभंग केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे.. नराधम आरोपीने चिप्सचे आमिष दाखवत घरात बोलावून नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिचा विनयभंग केला आहे. घडलेल्या प्रकाराची कोणाला माहिती सांगितली तर जीवे मारण्याची धमकीही यावेळी नराधम आरोपीकडून पीडित मुलीला देण्यात आली आहे. अत्याचार आणि विनयभंग केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात पोक्सो आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अल्पवयीन मुलगी ही अनुसूचित जातीची आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नराधम आरोपी कृष्णा बिराजदार यांच्या विरोधात उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत..

Live Update : रत्नागिरीत हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह

रत्नागिरीत हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळतोय.  रत्नागिरी शहराजवळील पेठकिल्ला येथील हनुमान मंदिरात श्री हनुमान सेवा मंडळाच्या वतीने यावर्षी देखील हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी या मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आज सकाळी जन्मकाळ साजरा करण्यात आला. तसेच दिवसभर भजन, किर्तन, सत्यनारायण पुजा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कोकणात हनुमान जयंती अगदी गावागावात साजरी केली जाते. त्यामुळे भाविकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतोय.

Live Update : शेतकरी कर्जमाफीचा विविध मागण्यांसाठी इस्लामपूरमध्ये प्रहार संघटनेचं टेंभा आंदोलन

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर मध्यरात्री आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर टेंभा आंदोलन करण्यात आले आहे. ज्यामध्ये हातात मशाल आणि गळ्यात भगवा व निळा ध्वज बांधून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Live Update : ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवे सचिव म्हणून सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले २० वर्षे मानद सचिव आहेत. तसेच महर्षी दयानंद महाविद्यालय आणि ग्लेनईगल्स हॅास्पिटलचे विश्वस्त म्हणून देखील सुधीर साळवी कार्यरत आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सुधीर साळवी यांना पक्षाच्या सचिव पदावर नियुक्ती झाल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलंय.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: