जाहिरात

Amit Shah on Kashmir : कोण होते ऋषी कश्यप, ज्यांच्या नावावरुन काश्मीरची उभारणी, अमित शाहांच्या वक्तव्यानंतर चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Amit Shah on Kashmir : कोण होते ऋषी कश्यप, ज्यांच्या नावावरुन काश्मीरची उभारणी, अमित शाहांच्या वक्तव्यानंतर चर्चा
नवी दिल्ली:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, काश्मीर देशातील असा भाग आहे जिथं भारताची दहा हजार वर्ष जुनी संस्कृती नांदते. अमित शाह दिल्लीत J&K and Ladakh Through the Ages पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने बोलत होते. ते म्हणाले की, भारताची संस्कृती समजून घेण्यासाठी आपल्या देशाला जोडणाऱ्या तथ्यांना समजून घ्यायला हवं. 

प्राचीन ग्रंथांमध्ये जेव्हा काश्मीर आणि झेलमचा उल्लेख मिळतो, तेव्हा कोणीच काश्मीर कुणाचं आहे हा प्रश्न उपस्थित करू शकत नाही. काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तो कायम राहील. कोणताही कायदा काश्मीरला भारतापासून वेगळं करू शकत नाही. या पुस्तकात जम्मू-काश्मीर आणि लडाखचा इतिहास, संस्कृती आणि महत्त्व सविस्तर लिहिण्यात आला आहे. याचा हिंदीतही अनुवाद आहे. 

Delhi Assembly Elections : भाजपला दिल्लीचा गड भेदता येणार?  या सहा गोष्टी अजेंड्यावर, विधानसभेसाठी काय आहे प्लान?

नक्की वाचा - Delhi Assembly Elections : भाजपला दिल्लीचा गड भेदता येणार? या सहा गोष्टी अजेंड्यावर, विधानसभेसाठी काय आहे प्लान?

कोण होते कश्यप ऋषी, ज्याचं काश्मीरसोबत नातं..
काश्मीरची संस्कृती आणि इतिहासावर केंद्रीत या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी अमित शाहांनी ऋषी कश्यप यांचंही नाव घेतलं.  याचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी काश्मीरचा इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे. काश्मीरचा इतिहास प्राचीन काळापासून पाहायला मिळतो. प्राचीन ग्रंथांमध्ये काश्मीरच्या संस्कृतीबद्दल सविस्तर वाचायला मिळतं. प्राचीन ग्रंथांमध्ये काश्मीरचं नाव ऋषी कश्यप यांच्या नावावरुन ठेवण्यात आल्याचा उल्लेख आहे. ऋषी कश्यप यांनी येथे तपस्या केली होती, असं म्हटलं जातं.  तर काही वृत्तांनुसार, काश्मीर घाटीत सर्वात आधी कश्यप समाजाचे लोक राहत होते. महाभारत काळात गणपतयार आणि खीर भवानी मंदिराचाही उल्लेख आहे. ते आजही काश्मीरात पाहायला मिळतात. 

काश्मीरच्या संदर्भात कश्यप यांच्या नावाचा उल्लेख का?
या पुस्तक प्रकाशनादरम्यान अमित शाहांनी सांगितलं, J&K and Ladakh Through the Ages या पुस्तकात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या मिथकांसंदर्भात लोकांच्या मार्गदर्शनाचं काम केलं आहे. देशातील प्रत्येक कोपऱ्याचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. प्रत्येक ठिकाणाचा संबंध भारताच्या प्राचीन संस्कृतीतून आहे. मात्र गुलामीच्या  कालखंडमध्ये हे विसरण्यात आलं. यादरम्यान ते म्हणाले, काश्मीर अशी जागा आहे जेथून देशातील विविध भागात संस्कृती आणि कलेचा प्रसार झाला. तर भगवान बुद्धांनंतर परिष्कृत बौद्ध धर्माची तत्त्वे देखील काश्मीरमध्येच उद्भवली होती.

महर्षी कश्यपांबद्दलची पौराणिक कथा...
काश्मीर घाटीचा ऋषी कश्यपांशी काय संबंध होता, यावरही अनेक पौराणिक कथा प्रचलित आहे. त्यानुसार, जलोद्धव नावाच्या राक्षसाला ब्रम्ह देवाचा आशीर्वाद मिळाला होता. ज्यानंतर राक्षस उत्पात करू लागला. राक्षसाला संतापून त्यांनी देवी भगवती यांच्याकडे विनंती केली. यानंतर देवीने पक्षाचं रुप धारण करीत चोचीने राक्षसाला रक्तबंबाळ केलं. पक्षाने जेथे राक्षसाचा संहार केला होता, कथेनुसार तेच हरी पर्वंत असल्याचं म्हटलं जातं. नंतर येथे ऋषी कश्यप पोहोचले आणि त्यांनी सरोवरातून पाणी काढून त्याची शुद्धी केली आणि तो भाग विकसित केला. पुराणानुसार, ऋषी कश्यप हे आपल्या प्राचीन भारतीय साहित्यातील सात ऋषींपैकी एक होते. त्यांना सृष्टीचे जनक देखील म्हटलं जातं. पुराणानुसार महर्षी कश्यप यांचा थेट संबंध ब्रह्मदेवाशी होता. त्यांनी अनेक स्मृती ग्रंथांची रचना केली होती. 

अमित शाह काय म्हणाले?
काश्मीरला ऋषी कश्यपांची भूमी म्हणूनही ओळखलं जातं. कदाचित त्यांच्या नावावरुच काश्मीरचं नाव ठेवलं गेलं असावं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com