Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू होता. पाकिस्तानचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला जशासतसं उत्तर दिलं जाईल, पर्यटकांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, असा देखील केंद्र सरकारने दिला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या लढाईल अमेरिकेने देखील भारताला पाठिंबा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी भारताला थेट पाठिंबा जाहीर केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या संवादात “आम्ही भारतासोबत आहोत” आणि “स्वत:चा बचाव करण्याच्या भारताच्या अधिकाराला अमेरिका पूर्ण पाठिंबा देते,” असे पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे.
राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, पाकिस्तानचा दहशतवादी संघटनांना समर्थन, प्रशिक्षण आणि निधी देण्याचा इतिहास आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा थेट उल्लेख करणारे राजनाथ सिंह हे पहिले वरिष्ठ केंद्रीय मंत्री ठरले आहेत.
या संरक्षण मंत्र्यांमधील संवादाआधी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी संवाद साधला. त्यांनी भारत आणि पाकिस्तानने “तणाव कमी करण्यासाठी एकत्र काम करावे” असे आवाहन केले होते.
ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: चुन-चुन कर मारेंगे! अमित शाहंनी दहशतवाद्यांना ठणकावले
भारत-अमेरिकेचा नौदल सराव सुरू
अरबी समुद्रात भारतीय नौदल आणि पाकिस्तानी नौदल यांच्यात एकाच वेळी सराव सुरू झाला असून, दोन्ही बाजूंनी ‘नाव एरिया' इशारे जारी केले आहेत. भारतीय लष्कराच्या संभाव्य कारवाईबाबत अटकळ वाढली असून, दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. नियंत्रण रेषेवर (LoC) सातत्याने शस्त्रसंधी उल्लंघन सुरूच आहे. त्यामुळे येत्या काळात मोठी घडामोड होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.