जाहिरात
This Article is From Jul 10, 2024

उत्तर प्रदेशात बस-ट्रकमध्ये भीषण अपघात, 18 प्रवाशांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये ट्रक आणि ट्रॅव्हल बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये 14 पुरुष, 3 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशात बस-ट्रकमध्ये भीषण अपघात, 18 प्रवाशांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये ट्रक आणि ट्रॅव्हल बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये 14 पुरुष, 3 महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. डबल डेकर बस दूध कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भरधाव वेगाने आलेल्या बसने दुधाच्या कंटेनर मागूच्या बाजूने जोरदार धडक दिली. अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

घटनेची मिळताच बेहटा मुजावर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व जखमींना बाहेर काढून जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उन्नावचे पोलीस अधीक्षक, इतर अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.

मुख्यमंत्री योगी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री योगी यांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: