Uttar Pradesh Accident News: मुलीचं धुमधडाक्यात लग्न लावून देणे हे प्रत्येक वडिलांचे स्वप्न असते. लाडक्या लेकीची मायेने सासरी पाठवणी करणं हा आईवडिलांसाठी खास क्षण असतो. पण एका वडिलांवर त्यांच्या लेकीचं लग्न पाहण्याचं स्वप्न अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी वेळ आलीय. मुलीच्या लग्नासाठी स्थळ पाहायला जात असताना तिच्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (14 नोव्हेंबर) दुर्घटनेत त्यांचा मुलगा आणि एक नातेवाईकही जखमी झालाय. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील जलेसर पोलीस ठाणे क्षेत्रात ही दुर्घटना घडलीय.
भरधाव वाहनाची बाइकला जोरदार धडक
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलेसर पोलीस ठाणे क्षेत्रातील देवरकनपूर गावाजवळ हा अपघात घडला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव पिकअप व्हॅनने मृत पावलेल्या व्यकीच्या बाइकला धडक दिली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
(Uttar Pradesh Accident News 50 Year Old Man Killed In Accident Travelling To Discuss Marriage Proposal For His Daughter)
अपघातात सुरेश गंभीर जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश ( वय 50 वर्ष) त्यांचा मुलगा राकेश आणि नातेवाईक विकाससह एकाच बाइकने सासनीच्या दिशेनं प्रवास करत होते. पिकअप व्हॅनची त्यांच्या बाइकला धडक बसताच ते खाली पडले आणि सुरेश यांना गंभीर दुखापत झाली. राकेश आणि विकास देखील जखमी झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव होत सुरेश यांना स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातातील जखमींवर औषधोपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा: Chhatrapati Sambhajinagar: भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, अपघात की घातपात?)
पिकअप व्हॅन चालक फरार
अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती पोलीस अधिकारी अमित कुमार सिंह यांनी दिली. पोलिसांनी सुरेश यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवलाय आणि फरार चालकाचा शोध सुरू आहे.
(Content Source : PTI Bhasha)