जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar: भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, अपघात की घातपात?

मृतदेह भालगाव येथील रहिवासी असलेले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: भाजप जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, अपघात की घातपात?

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील ही घटना आहे. या मृत्यूमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या नरवाडी शिवारात काल एक संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. तो मृतदेह भालगाव येथील रहिवासी असलेले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट

हदियाबाद नारवाडी मार्गावर नारवाडी शिवारात नळकांडी पुलाजवळ काल टेमकर यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती सरपंच आसिफ पटेल, गौरव विधाटे यांनी गंगापूर पोलिसांना दिली. पोनि. कुमारसिंग राठोड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन टेमकर यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात आणला.

दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा अपघात आहे की घातपात? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com