
Uttar Pradesh Crime News: प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला दारू पाजून त्याची गळा दाबून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकला अटक केली आहे. मात्र आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराने ज्याप्रकारे हत्या केली त्याला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, हा सगळा घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी नेहाने पती नागेश्वर रौनियारला आधी दारू पाजून आणि चिकन खाऊ घालून बेशुद्ध केले. त्यानंतर प्रियकर जितेंद्रसोबत मिळून त्याचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर, या घटनेला रस्ते अपघाताचे स्वरूप देण्यासाठी तिने मृतदेह बाईकवरून 25 किलोमीटर दूर नेऊन रस्त्यावर फेकून दिला. मात्र, पोलिसांच्या तपासात तिचा हा बनाव उघडकीस आला असून, पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
(नक्की वाचा- Nashik News: अनोळखी मुलांना काकूंनी पाणी दिलं; मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून थरकाप उडेल, पाहा VIDEO)

नागेश्वर रौनियार याचे सहा वर्षांपूर्वी नेहाशी लग्न झाले होते. नेहाचे गेल्या एक वर्षापासून गावातीलच जितेंद्रसोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमसंबंधांमुळे दोन महिन्यांपूर्वी नेहा नागेश्वरला सोडून तिच्या 5 वर्षांच्या मुलासोबत आणि प्रियकरासोबत महाराजगंज शहरात एका भाड्याच्या घरात राहत होती.
नेहाने प्रियकरासोबत मिळून पती नागेश्वरला आपल्या खोलीवर बोलावले. तिथे त्याला चिकन आणि दारू पाजून त्याचे हात-पाय बांधले आणि त्याचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेहाला अंघोळ घातली, दुसरे कपडे घातले आणि नंतर प्रियकरासोबत बाईकवरून 25 किलोमीटर दूर असलेल्या निचलौल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधुरिया-निचलौल महामार्गावर मृतदेह फेकून दिला. तिथे त्यांनी बाईक आणि मृतदेह रस्त्यावर सोडून हा एक रस्ते अपघात असल्याचा बनाव रचला.

(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: ब्लॅकमेलिंगला कंटाळून फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट)
पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले सत्य
मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी नेहाची कठोर चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, तिचा पती नागेश्वर त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा आणत होता, त्यामुळेच तिने प्रियकरासोबत मिळून त्याच्या हत्येचा कट रचला. नेहाचा प्रियकर जितेंद्रच्या दुकानातच नागेश्वर मजुरीचे काम करत होता. या प्रकरणात पोलिसांनी नेहा आणि जितेंद्रला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world