लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा

UP Farmer: उत्तर प्रदेशातील सहारपूर येथील प्रयोगशील शेतकरी संदीप चौधरी यांनी पिकवलेला जगातील सर्वात महागडा 'मियाझाकी' आंबा सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात महागडा आणि दुर्मिळ मानला जाणारा 'मियाझाकी' आंबा पिकवणाऱ्या एका शेतकऱ्याने आपल्या औदार्याने सर्वांची मने जिंकली आहेत. ग्राम थरोली येथील शेतकरी संदीप चौधरी यांनी 3 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आपल्या शेतात मियाझाकी आंब्याची यशस्वी लागवड केली आहे.

3.5 लाखांचा व्यवहार अन् 'आई'साठी दिलेली सवलत

गुजरात राज्यातील सुरत येथील मोठे व्यावसायिक प्रवीण गुप्ता यांनी संदीप चौधरी यांच्याकडून 1 किलो मियाझाकी आंबे (एकूण 4 आंबे) खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या आंब्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य लक्षात घेऊन सुरुवातीला हा व्यवहार 3 लाख 50 हजार रुपयांना निश्चित करण्यात आला होता.

Advertisement

मात्र, संभाषणादरम्यान व्यापारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, ते हे मौल्यवान आंबे 'एक झाड आईच्या नावाने' या भावनेतून आपल्या आईला समर्पित करण्यासाठी खरेदी करत आहेत. एका मुलाचे आपल्या आईप्रती असलेले हे निस्सीम प्रेम पाहून शेतकरी संदीप चौधरी यांचे मन विघळले. त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता थेट 1,39,000 रुपयांचे डिस्काउंट दिले आणि अंतिम सौदा 2,11,000 रुपयांना पक्का केला.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

1 ऑगस्टला गुजरातमध्ये होणार डिलिव्हरी

या व्यवहाराअंतर्गत व्यापारी प्रवीण गुप्ता यांनी 1,11,000 रुपये ऑनलाईन ॲडव्हान्स म्हणून जमा केले आहेत. उर्वरित 1 लाख रुपये 1 ऑगस्ट रोजी आंब्याची डिलिव्हरी मिळताना दिले जातील. शेतकरी संदीप चौधरी स्वतः गुजरातला जाऊन हे आंबे प्रवीण गुप्ता यांच्या सुपूर्द करणार आहेत. विशेष म्हणजे, या विक्रीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नातील 10 टक्के रक्कम गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी दान करणार असल्याची घोषणाही संदीप चौधरी यांनी केली आहे.

'लोक टिंगल उडवायचे, आज यश मिळाले!'

संदीप चौधरी यांनी सांगितले की, 3 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी मियाझाकी आंब्याची झाडे लावली होती, तेव्हा "आंबा कधी लाखांत विकला जातो का?" असे म्हणत गावकरी त्यांची टिंगलटवाळी करायचे. मात्र, आज त्यांच्याकडे ऑरगॅनिक पद्धतीने वाढवलेली 40 पेक्षा जास्त मियाझाकी आंब्याची झाडे आहेत. पारंपरिक पिकांऐवजी शेतकऱ्यांनी अशा उच्च मूल्याच्या आणि सेंद्रिय पिकांकडे वळावे, असा सल्ला त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.

(नक्की वाचा- Wardha Crime: इन्स्टाग्रामचं एक नोटिफिकेशन महागात पडलं; 'एक क्लिक' अन् 12 लाखांचा गायब)

का एवढा महाग आहे 'मियाझाकी' आंबा?

मियाझाकी आंब्याचा गर अत्यंत मऊ आणि रसाळ असतो. यामध्ये विपुल प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. मूळचा जपानमधील असलेला हा आंबा अत्यंत दुर्मिळ मानला जातो आणि त्याची लागवड कठीण असते.
 

Advertisement

Topics mentioned in this article