जाहिरात

बाबा, आम्ही वाचणार नाही… हर्षिल खोऱ्यातून आला शेवटचा फोन, उत्तरकाशीमधील ही कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी!

Uttarakhand Cloudburst : काली देवी 5 तारखेला सकाळी 11 च्या सुमारास भटवाडीला जाण्यासाठी हर्षिल खोऱ्यातून निघाल्या होत्या, पण इतका मोठा पूर येईल, असा त्यांनी विचारही केला नव्हता.

बाबा, आम्ही वाचणार नाही… हर्षिल खोऱ्यातून आला शेवटचा फोन, उत्तरकाशीमधील ही कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी!
Uttarakhand Cloudburst : 'आम्ही स्वतः आमच्या मुलांना शोधू,' अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.
मुंबई:

Uttarakhand Cloudburst : ‘बाबा, आता आम्ही वाचणार नाही… नाल्यामध्ये खूप पाणी आलं आहे…' हर्षिलमधून त्यांच्या मुलाने केलेला हा 2 मिनिटांचा शेवटचा कॉल आठवून नेपाळचे रहिवासी काली देवी आणि त्यांचे पती विजय सिंग रडत आहेत. नेपाळचे रहिवासी असलेल्या काली देवी 5 तारखेला दुपारी 12 वाजता भटवाडीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या आणि त्यांचे पती वाचले, पण त्यांच्यासोबतच्या 26 लोकांच्या समूहांपैकी कोणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही. 

हेलीपॅडवर बसून आई रडतेय

काली देवी 5 तारखेला सकाळी 11 च्या सुमारास भटवाडीला जाण्यासाठी हर्षिल खोऱ्यातून निघाल्या होत्या, पण इतका मोठा पूर येईल, असा त्यांनी विचारही केला नव्हता. ‘मला एवढ्या मोठ्या पुराची कल्पना असती, तर मी आलेच नसते,' असे काली देवी यांनी सांगितले. त्या भटवाडीच्या हेलिपॅडवर बसून सतत रडत आहेत. , ‘कृपया आम्हाला हर्षिल खोऱ्यात जाऊ द्या, आम्ही स्वतः आमच्या मुलांना शोधू,' अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे. 

बुधवारी, काली देवी आणि विजय सिंग चालत गंगवाडीपर्यंत गेले होते, पण पूल वाहून गेल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. हर्षिल खोऱ्यात रस्ते आणि पूल बांधण्याचे काम सुरू होते, त्यावेळी लष्कर आणि अनेक मजूर तिथे काम करत होते, पण दुपारी 3 वाजता आलेल्या पुरामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले.

( नक्की वाचा : Uttarakhand Update : उत्तराखंडच्या महाप्रलयातील दिलासादायक बातमी! पुण्यातील 'ते' 24 जण सुखरुप )
 

 हर्षिल खोऱ्याचा संपर्क तुटला

उत्तरकाशीपासून सुमारे 80 किमी दूर असलेल्या हर्षिल खोऱ्याला मोठे सामरिक महत्त्व आहे, त्यामुळे तिथे लष्कराचा तळ आहे. या महापुरात लष्कराचे 11 जवानही वाहून गेले होते, त्यापैकी 2 जवानांना वाचवण्यात यश आले आहे. 9 अजूनही बेपत्ता आहेत. भटवाडीपासून सुमारे 30 किमी दूर असलेल्या गंगवाडीपर्यंत NDTV INDIA ची टीम गेली, पण BRO चा 100 मीटर लांब लोखंडी पूल पूर्णपणे गायब झाला होता.

Latest and Breaking News on NDTV

भागीरथी नदीचा प्रवाह इतका वेगवान आहे की, तिने मोठे मोठे दगडही वाहून नेले आहेत. गंगवाडीमध्ये जिथे पूल होता, तिथे आता सुमारे 25-30 मीटर खोल दरी तयार झाली आहे. त्यामुळे NDRF, SDRF आणि प्रशासनाला जमिनीच्या मार्गाने पोहोचता येत नाहीये. NDRF ने हा रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला, पण काही तास प्रयत्न करूनही त्यांना यश मिळालं नाही. या कामात आता लष्कराची मदत घेण्यावर विचार सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com