जाहिरात

Uttarakhand cloudburst: उत्तराखंडमध्ये ढगफुटी! महाराष्ट्रातील किती पर्यटक अडकले?

येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.

Uttarakhand cloudburst: उत्तराखंडमध्ये ढगफुटी! महाराष्ट्रातील किती पर्यटक अडकले?

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला. त्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 11 व इतर जिल्ह्यांतील 40 अशा 51 पर्यटकांचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

उत्तराखंड मध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांची संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी  संपर्क साधला जात आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.

नक्की वाचा - Cloud burst video: संपूर्ण गावाला नदीनं गिळलं, ढगफुटीची दृश्य पाहून काळीज थरथरलं, पाहा Video

  • राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : 9321587143 / 022-22027990 / 022-22794229
  • राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : 0135-2710334 /821

नांदेडहून उतराखंडला 11 पर्यटक गेले होते. हे सर्व अकरा युवक सुखरूप आणि सुरक्षित आहेत. त्या युवकांपैकी सचिन पत्तेवार याने व्हिडियो पाठवून सर्वजण सुखरूप असल्याचे सांगितले आहे. नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यातील डोनगाव येथील अकरा युवक एक ऑगस्ट रोजी उतराखंडला केदारनाथ यात्रेसाठी गेले होते. मात्र काल ढगफुटी आणि अतिवृष्टी झाल्याने त्यांची तुटातूट झाली होती. दरम्यान आज सर्व अकरा जण सोबत आहेत. उत्तरकाशी जिल्ह्यांतील खराडी या गावी सुरक्षित असल्याचे सचिन पत्तेवार याने सांगितले.

नक्की वाचा - निसर्गाचा उद्रेक, मृत्यूचं तांडव अन् रेस्क्यू, उत्तरकाशीत आतापर्यंत काय काय घडलं? धरालीशी संबंधित 7 महत्त्वाचे अपडेट

त्यात बरोबर  सोलापुरातील चार तरुण ही उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. या तरुणांनी कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे असून सुखरूप असल्याचे सांगितले आहे. मात्र कालपासून चौघाचेही फोन लागत नसल्याची कुटुंबियांची माहिती दिली आहे.  विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे असे सोलापुरातील चौघे उत्तराखंड गेलेले तरुणांची नावे आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघाची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पालधी गावातील 13 जण ही उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com