जाहिरात

Vaishno Devi landslide : वैष्णो देवी भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढला, 32 जण दगावले; अद्यापही बचावकार्य सुरू

वैष्णो देवी मंदिर मार्गावरील कटरा शहरापासून डोंगराळ मंदिरापर्यंतच्या 12 किमीच्या मार्गावर भूस्खलन झाले.

Vaishno Devi landslide : वैष्णो देवी भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढला, 32 जण दगावले; अद्यापही बचावकार्य सुरू
जम्मू:

वैष्णो देवीमध्ये भूस्खलनच्या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढून 32 पर्यंत पोहोचली आहे. वैष्णोदेवी मंदिर मार्गावरील अर्धकुवारीजवळ मंगळवारी भूस्खलन झालं होतं. कालपर्यंत मृतांचा आकडा पाच होता. आज त्यात वाढ झाली असून आतापर्यंत 32 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अद्यापही तेथे बचावकार्य सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अर्धकुवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून काम सुरू आहे. अद्यापही रेस्क्यू काम पूर्ण झालेलं नाही. ढिगाऱ्याखाली अद्यापही काही जणं अडकल्याची भीती आहे. कटरा शहरापासून टेकडीवर असलेल्या मंदिरापर्यंतच्या 12 किमीच्या वळणाच्या मार्गाच्या मध्यभागी भूस्खलन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया साइट X वर पोस्ट करून या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

वैष्णो देवी मंदिरात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. हिमकोटी मार्गावर सकाळपासून यात्रा स्थगित करण्यात आली होती. मात्र जुन्या रस्त्यावर रात्री 1.30 वाजेपर्यंत यात्रा सुरू होती. मात्र मुसळधार पावसामुळे अधिकाऱ्यांनी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. 

Vaishnav Devi landslide: वैष्णो देवी मार्गावर मोठी दरड कोसळली, 5 ठार, 14 जखमी, यात्रा थांबली

नक्की वाचा - Vaishnav Devi landslide: वैष्णो देवी मार्गावर मोठी दरड कोसळली, 5 ठार, 14 जखमी, यात्रा थांबली

मदतीसाठी वायुसैन्याचं विमान जम्मूला पोहोचलं

भारतीय वायुसैन्याचं एक सी-130 विमान बुधवारी मदतीसाठी जम्मूला पोहोचलं आहे. वैष्णो देवी मार्गावर झालेल्या भूस्खलनादरम्यान अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी भारतीय वायुसैन्याचं विमान पोहोचलं आहे.  

राहत और बचाव सामग्री लेकर भारतीय वायुसेना का एक सी-130 परिवहन विमान बुधवार को माता वैष्णो देवी तीर्थस्थल मार्ग पर अर्धकुंवारी के पास हुए भूस्खलन से प्रभावित लोगों को सहायता प्रदान करने के लिए जम्मू पहुंच गया. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) साहित्य घेऊन जाणारे सी१३० वाहतूक विमान उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन हवाई दल तळावरून उड्डाण घेऊन जम्मूला पोहोचले.

Latest and Breaking News on NDTV

याशिवाय जम्मू, उधमपूर, श्रीनगर आणि पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळांवर चिनूक आणि एमआय-१७ व्ही५ सारखी हेलिकॉप्टर स्टँडबाय ठेवण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्धकुमवारीजवळील वैष्णोदेवी मार्गावर मंगळवारी भूस्खलन झाले होते. तिथे बचावकार्य सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात बुधवारी चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरग्रस्त सखल भागातून हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले.

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com