जाहिरात
Story ProgressBack

Video - हिच्याकडेच नागमणी असणार! झोपलेल्या महिलेच्या केसात फिरणारा साप पाहून लोकं हादरले

हैरान कर देने वाले इस वीडियो में सोती हुई महिला के बालों में एक सांप रेंगता हुआ दिखाई दे रहा है. सोशल मीडिया पर यह वीडियो इन दिनों काफी छाया हुआ है.

Read Time: 2 mins
Video - हिच्याकडेच नागमणी असणार! झोपलेल्या महिलेच्या केसात फिरणारा साप पाहून लोकं हादरले
महिलेच्या केसात फिरतोय साप

साप दिसला की अनेकांची पाचावर धारण बसते, साप पाहिल्यानंतर लोकं गर्भगळीत होतात आणि त्यांना घाम फुटतो. साप विषारी असो अथना नसो, तो दिसला की माणसं घाबरतातच. विषारी साप चावला आणि वेळेत उपचार मिळाले नाही तर माणसाचा मृत्यू होतो. अनेकांना कोणता साप हा विषारी असतो आणि कोणता साप विषारी नसतो हे माहिती नसतं ज्यामुळे सापाबाबत मानवाच्या मनात मोठे भय असते. मात्र काही माणसं असतात जी सापांना अजिबात घाबरत नाही. एक महिला झोपलेली असताना तिच्या केसात साप फिरत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून या व्हिडीओवर कॉमेंटचा पाऊस पडतोय. 

केसात फिरतोय साप

काशीकयात्रा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला दोन्ही हात डोक्यावर ठेवून पालथी झोपलेली दिसते आहे. ही महिला गाढ झोपेत असून तिच्या केसात  एक साप फिरताना दिसतोय. केसात लपलेला हा साप डोक्याच्या पाठच्या बाजूला सरपटत जाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून हा व्हिडीओ आतापर्यंत 2.7 कोटी लोकांनी पाहिला आहे.  2 लाख 26 हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला असूनन 1 लाख 28 हजारांपेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ शेअर केला आहे. 
 

व्हिडीओ पाहा

'नागमणी नक्की हिच्याकडेच असणार'

या व्हिडीओवरील प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की हा साप खरा नसून तो नकली आहे. एकाने म्हटलंय की असा सापांशी आम्ही बिहारमध्ये लहानपणी खेळत होतो. हा साप विषारी नसून तो चावत नाही असे काहींनी म्हटले आहे. अन्य एकाने म्हटलंय की आम्ही लहान असताना अशा सापांना पकडायचो आणि त्यांच्यासोबत खेळायचो. एकाने म्हटलंय की असे साप आम्ही खिशात ठेवत होतो. दुसऱ्या एकाने म्हटलंय नागमणी हिच्याकडेच असणार. '

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख ठरली, अर्थमंत्र्यांकडून तयारीला सुरूवात
Video - हिच्याकडेच नागमणी असणार! झोपलेल्या महिलेच्या केसात फिरणारा साप पाहून लोकं हादरले
Supreme Court rejects demand for CBI inquiry into NEET exam 2024 result
Next Article
NEET परीक्षा गोंधळाबाबत सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
;