Chennai News: माशांच्या लोभापायी एका तरुणासोबत अतिशय विचित्र घटना घडली आहे. TNNने दिलेल्या वृत्तानुसार, 29 वर्षीय मणिकंदन मासे पकडण्यासाठी तलावामध्ये उतरला होता. चेन्नईतील मदुरंतकमच्या कीलावलम परिसरातील ही घटना आहे. तलावाच्या पाण्यात हात टाकताच त्याने दोन मासे पकडले. पकडलेला मासा हातातून निसटून जाईल म्हणून त्याने एक मासा चक्क तोंडात भरला. आणखी एक मासा पकडण्यासाठी तो खाली वाकला आणि त्याने तलावात हात टाकला. यादरम्यान त्याच्या तोंडातील जिवंत मासा थेट घशात गेला आणि श्वसननलिकेत अडकला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गळ्यामध्ये मासा अडकला आणि मृत्यू झाला
मासा गळ्यामध्ये अडकल्याने तरुणाला श्वास घेताना अडचणी निर्माण होऊ लागल्या. तलावातून तो बाहेर आला आणि त्याने थेट घराच्या दिशेने धाव घेतली. पण जीव गुदमरल्याने रस्त्यातच तो बेशुद्ध पडला. मणिकंदनला औषधोपचारांसाठी तातडीने सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मासा घशामध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
(नक्की वाचा: Shocking VIDEO : 'साहेब मला वाचवा...', लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी मारहाण)
केरळमध्येही माशांचा लोभापायी तरुणाचा गेला होता जीव
महिनाभरापूर्वी केरळमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. 2 मार्चला येथेही घशामध्ये मासा अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. केरळमधील अलप्पुझा येथे मासे पकडण्यासाठी हा तरुण शेतामध्ये गेला होता. त्यानेही पकडलेला मासा तोंडामध्ये भरला . दुसरा मासा पकडायला पाण्यात हात टाकला आणि तोंडातील मासा घशामध्ये अडकला. श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला.
(नक्की वाचा: अजब पतीची गजब गोष्ट! आधी पत्नीचं प्रियकराबरोबर लग्न लावलं, 4 दिवसानंतर मात्र भलतचं घडलं)