
Wife Beats Husband : नवऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या बायकोचा व्हिडीओ सोशल मीडियातून समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यातील हे घरगुती हिंसाचाराचं प्रकरण आहे. व्हिडिओत दिसत आहे की महिला नवऱ्याशी क्रूरपणे भांडताना दिसत आहे. तर नवरा हात जोडून तिला सोडून जाण्याची विनंती करत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 20 मार्च रोजी दुपारी घडली आहे. सतना रेल्वे विभागात लोको पायलट म्हणून तैनात असलेले लोकेश माझी यांना त्यांची पत्नी हर्षिता रायकवार हिच्याकडून त्रास दिला जात आहे. घटनेच्या वेळी हर्षिताची आई आणि भाऊ देखील उपस्थित होते. लोकेशने आरोप केली का हर्षिता त्याला नेहमी मारहाण करते. खोटे खटले दाखल करत आत्महत्या करण्याची धमकीही देते.
मारहाणीचा VIDEO
'My wife beats me sir, save me from my wife sir' Lokesh submitted an application to the Superintendent of Police office in Panna, Madhya Pradesh, narrating the story of his wife's cruelty and seeking help. CCTV footage of his wife beating him surfaced.
— Satyaagrah (@satyaagrahindia) April 2, 2025
Join |… pic.twitter.com/WBbeXCCTKu
मला वाचवा, पोलिसांना विनंती
लोकेशने सतना आणि पन्ना येथील पोलीस अधीक्षकांच्या पत्र लिहून पत्नीपासून वाचवण्याची विनंती केली आहे. पोलीस अधीक्षकांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. लोकेशने मारहाणीचे व्हिडीओ देखील पोलिसांना दिले आहे. याआधीही लोकेशने अनेक ठिकाणी तक्रार केली, पण त्याचा होत असलेला छळ तो सिद्ध करु शकत नव्हता. त्यानतंर त्याने छुप्या कॅमेऱ्याची मदत घेत भांडणाचा व्हिडिओ बनवला, जो व्हायरल होत आहे.
(नक्की वाचा - Dombivli Crime : रीलस्टार सुरेंद्र पाटीलविरोधात लैंगिक अत्याचारात गुन्हा; पुण्याच्या तरुणीसोबत काय घडलं?)
काय आहे प्रकरण?
लोकेश आणि हर्षिताचं जून 2023 मध्ये लग्न झाले आहे. लग्नानंतर लगेचच पत्नी, सासू आणि मेहुण्याने लोकेशकडे पैसे आणि सोने-चांदीची मागणी करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याचा मानसिक आणि शारीरिक छळही करू लागले. लोकेशने सांगितलं की, लग्न झाल्यापासून त्याची पत्नी हर्षिता त्याला त्याच्या घरच्यांना भेटू देत नव्हती. कोणालाही घरी येऊ देत नव्हती, मित्रांना भेटू देत नव्हती. नेहमी शिवीगाळ करते आणि मारहाणही करते. या सर्व गोष्टींचा पर्दाफाश करण्यासाठी त्याने घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवला. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world