- दिल्ली पुलिस की कॉन्स्टेबल सोनिका यादव ने सात महीने की प्रेग्नेंसी में वेटलिफ्टिंग में ब्रॉन्ज मेडल जीता है.
- उन्होंने ऑल इंडिया पुलिस वेटलिफ्टिंग क्लस्टर 2025–26 में 145 किलो डेडलिफ्ट कर नया रिकॉर्ड बनाया.
- 2014 बैच की सोनिका को 2022 में दिल्ली पुलिस कमिश्नर और केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी ने सम्मानित किया था.
Viral Video: जिद्द आणि इच्छा असेल तर कोणतीही गोष्ट करणं अशक्य नाही, याचेच आदर्श उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सात महिन्यांची प्रेग्नेंट असणाऱ्या महिलेने तब्बल 145 किलो वजन उचलून सर्वांना आश्चर्यचकित केलंय. दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल (Delhi Police Constable) म्हणून कार्यरत असणाऱ्या सोनिका यादव यांनी अनोखा इतिहास रचलाय. 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट असलेल्या सोनिका यादव यांनी आंध्र प्रदेशमध्ये ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग क्लस्टर 2025-26 स्पर्धेत केवळ सहभागच नोंदवला नाही तर पारितोषिकही जिंकलं. ऑल इंडिया पोलीस वेटलिफ्टिंग क्लस्टर 2025–26 स्पर्धेत लोकांना वाटलं की सोनिका त्यांची श्रेणी बदलून जड स्वरुपातील वजन उचलत आहे, पण जसे त्यांनी 145 किलो वजन उचललं तेव्हा सर्वांचेच डोळे फिरले.

प्रेग्नेंसीनंतरही ट्रेनिंग सुरू होते
सोनिका यादव (Sonika Yadav) या सात महिन्यांच्या प्रेग्नेंट आहेत. मे महिन्यामध्ये त्यांना प्रेग्नेसीची माहिती समजली. त्यामुळे आता जिम आणि ट्रेनिंग बंद होईल, असे त्यांच्या पतीला वाटलं. पण थांबायचं नाही, असे सोनिका यांनी निश्चित केले होतं. प्रेग्नेंसीदरम्यानही वेटलिफ्टिंगचं ट्रेनिंग सुरू ठेवलं आणि याच हिंमतीवर स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकल्याचं सोनिका यांनी सांगितलं. या स्पर्धेत सोनिका यांनी 125 किलो स्क्वॅट्स, 80 किलो बेंच प्रेस आणि त्यानंतर 145 किलोचे वजन उचललं.
सोनिका यांनी केला होता रीसर्च
सोनिका (Delhi Police Constable Sonika Yadav) यांनी सांगितलं की, इंटरनेटवर रीसर्च केल्यानंतर आढळलं की लुसी मार्टिन्स नावाच्या महिलेनंही प्रेग्नेंसीदरम्यान अशी कामगिरी केली होती. लुसीशी इन्स्टाग्रामवर संपर्कही केला आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग टिप्स घेतल्या.
सोनिका प्रेग्नेंट आहेत, हे स्पर्धेदरम्यान सुरुवातीला कोणालाही समजलं नाही. स्पर्धेच्या ठिकाणी सैल पोशाख परिधान करून त्या पोहोचल्या होत्या. बेंच प्रेसदरम्यान पती त्यांना उठण्यासाठी मदत करत होते, त्यावेळेसही लोकांना काही कळत नव्हते. यानंतर जेव्हा सत्य सर्वांसमोर आले तेव्हा संपूर्ण स्टेडिअममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रतिस्पर्धी टीममधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले.
चांगल्या कामगिरीसाठी गौरव
- सोनिका या 2014च्या बॅचच्या कॉन्स्टेबल आहेत आणि सध्या त्या कम्युनिटी पोलिसिंग सेलमध्ये तैनात आहे.
- यापूर्वी त्यांनी अमली पदार्थांविरोधातील मोहीमेमध्येही उत्कृष्ट कामगिरी केलीय.
- 2022मध्ये दिल्ली पोलीस आयुक्तांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता.
- महिला दिनी देखील तत्कालिन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्तेही त्यांना सन्मानित करण्यात आले होतं.
कबड्डीपासून ते पॉवरलिफ्टिंगपर्यंतचा प्रवास
कबड्डी खेळामुळे सोनिका यांनी क्रीडा क्षेत्राची ओळख झाली. पण जिममध्ये वेटलिफ्टिंग करणं सुरू आणि त्यांना स्वतःमधील खऱ्या सामर्थ्याची जाणीव झाली. वर्ष 2023मध्ये त्यांनी दिल्ली स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आणि तेव्हापासून त्याचा हा नवा प्रवास सुरू झाला.
प्रेग्नेंसी म्हणजे कमकुवतपणा नाही तर एक नवी ताकद आहे, हे सोनिका यादव यांनी सिद्ध करून दाखवलंय.
(नक्की वाचा: 240 Crore Lottery News: तरुणासाठी आईच्या जन्मतारखेचे लॉटरी तिकीट ठरलं लकी, 240 कोटी रुपयांचा लागला जॅकपॉट)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
